महावितरणाचे शेतकऱ्याच्या समस्यानकडे दुर्लक्ष.! शेतकरीलाच करावे लागते ट्रान्सफाँर्मवर वायरमनचे काम…लासूर परिसरात विजेचा लपंडाव; शेतीपंप चालेना.

चोपडा प्रतिनिधी –

लासूर चोपडा – सध्या हिवाळा सुरू असल्याने शेतीची कामे जोरात सुरू आहेत. शेतकऱ्यानी आपल्या शेतात कांदा ं,हरबरा, मक्का, सूर्यफूल, दादर, आदि पिकांची पेरणी केली आहे. आणि त्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी रात्र दिवस शेतात थंडी असो वा रात्र डोळ्यात तेल घालून आपल्या पिकांना पाणी देण्यासाठी धडपडत असतो. परंतु या परिसरात बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असून देखील शेतीसाठी महावितरण कडून दिली जाणारा विद्युत पुरवठा हा सुरळीत सुरू नसून. दिवसात कमीत कमी दोन ते तीन तास वीजपुरवठा कपात केला जातो. शिवाय विहिर किंवा कुपनलिकेला लागणारा विद्युत पुरवठा हा कमी दाबाचा असल्यामुळे बर्याच भागामध्ये इलेक्ट्रिक मोटर सुरू होत नाही. अन्यथा स्टार्टर खराब होण्याची भीती किंवा इलेक्ट्रिक मोटर जळण्याची प्रमाण जास्त असल्यामुळे शेतकऱ्याना नाहक आर्थिक भुर्दंड बसतो. शिवाय पिकांना पाणी देण्यासाठी उशिर होतो.म्हणून महावितरणने कमी दाबाचा विद्युत पुरवठा नेता जास्त दाबाचा द्यावा. अशी मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे. 
दरम्यान दिवसा जे विद्युत पुरवठा हा कपात केला जातो. तो कपात केलेल्या विद्युत पुरवठा वाढवून द्यावा. जेणेकरून शेतकऱ्याचे शेतातले पाणी पिकांना मुबलक देता येईल. अशी मागणी केली जात आहे. याकडे महावितरण चे मुख्य कार्यकारी अभियंता  यांनी जातीने लक्ष देवून शेतकऱ्याचे प्रश्न सोडवावे. अशी मागणी केली जात आहे. 

जिव धोक्यात घालून शेतकऱ्याना करावे लाईमनचे काम…

बऱ्याच वेळा शेतातला ट्रान्सफॉर्मर वर डिओ किंवा फ्यूज गेला असेल तर त्यासाठी शेतकऱ्याना आपला जीव मुठीत धरून हे काम करावे लागते. ट्रान्सफॉर्मर चे किरकोळ काम राहिले तर त्यासाठी झिरो वायरमनला बोलवून ते काम करावे लागते. यासाठी गांवातील एका झिरो वायरमनला आपला प्राण गमवावा लागल आहे. तरि देखील महावितरणच वायरमन येत नाही, त्यांच्या जवळ अपुरी मनुष्य बळ संख्या असल्याने त्यांना अतिरिक्त कामाचा बोजा असल्याने मुळे त्यांना वेळ देता येत नाही, परंतु शेतकऱ्याना आपला जीव धोक्यात घालून त्यांचे काम स्वतः ला करावे लागत आहे. यासाठी महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता यांनी जातीने लक्ष देवून हि समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे अशी मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!