अडावद येथे ईद – ए – मिलादुन्नबी सण उत्साहात साजरा..
अडावद ता.चोपडा : (प्रतिनिधी)
चोपडा तालुक्यातील अडावद येथे -ईद – ए – मिलाद नबी मुहम्मद पैगंबर जयंती अडावद येथे शांततेत व मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जन्मदिवस असल्याने हा दिवस मुस्लिम बांधवासाठी महत्त्वाचा असतो म्हणून हा दिवस ईद -ए- मिलादुन्नबी म्हणून साजरा करण्यात येतो.घर व धार्मिक ठिकाणी सजावट करतात तसेच फळ,मिठाई वाटप करण्यात आले.मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या वाचनाचे कुराणाचे पठण व प्रार्थना केली जाते.यावेळी अडावद पो.स्टेशन चे एपीआय किरण दांडगे साहेब ,सरपंचपती पी.आर.माळी सर,उपसरपंचपती सचिन महाजन, जावेद मेंबर, कालु मेंबर, हनुमंत महाजन, अनिल देशमुख, अल्ताफ पठाण,अमिन मेंबर, फकिरा मेंबर, माजी.पं.सभापती ताहेर मन्यार,ठेंगा सोसायटी चे माजी. चेअरमन वजाहत अली काझी,सर्व प्रतिष्ठित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन जुनेद एम खान,नेहरू चौक मुस्लिम बांधव,महमूद एलेकार,मुनसफ खान,नफीस खाटीक, सालीम कुरेशी, याकूब शाह,अल्ताफ खान,जाफर मन्यार, इकबाल खाटीक, अल्ताफ मंसूरी,अलीम मन्यार, जफर शाह,इदरिश पिंजारी, मुदस्सर खान,इमरान खान,आफताब निमन,रहेबर अली,असर खान, दाऊद शाह,इमरान पिंजारी, यांच्या सह समस्त बांधव उपस्थित होते.सुत्रसंचालन व आभार फारूक शाह नोमानी यांनी केले.