चोपडा तालुका भारतीय जनता पार्टीकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी निवेदन सादर..
चोपडा-
दि.13 आॅगस्ट 2021,शुक्रवार रोजी चोपडा तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी बांधवाना दिलासा मिळाव म्हणून
एकरी 50,000 रुपये नुकसानभरपाई मिळण्याबाबत तहसिलदार अनिल गावित साहेबांना भारतीय जनता पार्टी चोपडा तालुका च्या वतीने निवेदन
पाऊस नसल्यामुळे पिकांचे पंचनामे करून एकरी पन्नास हजार रुपये नुकसानभरपाई मिळावी या हंगामात मुख्य पिक असलेले उडीद,मुग,सोयाबीन ,कापूस ज्वारी बाजरी, मका इत्यादी पिकाची शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानी पेरणी केली परंतु नंतर दुबार पेरणी करून सुध्दा पावसाने दंडी मारल्या मुळे उभे पिक जळायला लागले असून या मुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.. त्यामुळे शेतकरी पुर्ण पणे खचलेला असुन शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी पाऊसा अभावी जळालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून एकरी 50000 रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी चोपडा तालुका च्या वतीने मा.तसिलदार साहेब अनिल गावित यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे..
यावेळी उपस्थित जेष्ठ नेते व मा.सभापती आत्माराम म्हाळके,उ.महा.ओबीसी आघाडी अध्यक्ष प्रदिप पाटील, तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल, प्रकाश पाटील युवा मोर्चा अध्यक्ष,जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे,जिल्हाचिटणीस रंजनाताई नेवे,बाजार समिती संचालक धनंजय पाटील,सहकार आघाडी तालुकाध्यक्ष हिंमतराव पाटील,सरचिटणीस हनुमंत महाजन,चंद्रकांत धनगर,सुनिल सोनगिरे,जिल्हा अनुसुचित जमाती अध्यक्ष मगन बाविस्कर,जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र पाटील,भरत सोनगिरे,संभाजी पाटील,नादान पावरा,रावसाहेब पाटील, रणजित पाटील प्रताप पावरा,मिलिंद वाणी,चंद्रशैखर ठाकरे,योगराज पाटील,अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष संजय श्रावगी,विजय सौ.माधुरीताई अहिरराव,सौ.अनिता नेवे,विजय बाविस्कर,राजेश पाटील,विनायक पाटील,लक्ष्मण पाटील,विठ्ठल पाटील,बापूराव पाटील,कैलास पाटील,कमलेश मराठे,ज्ञानेश्वर पाटील,भुषण पाटील,गोपाल पाटील,प्रशांत कासार,अमित तडवी,अार आर पाटील,हर्षल सोनवणे,धिरज सुराणा,सुमित विसपुते,यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..