शिवजयंतीनिमित्त इनरव्हिल क्लब ऑफ संगम चाळीसगाव वतीने महिलांसाठी विविध स्पर्धा संपन्न….

चाळीसगाव प्रतिनिधी – ( संदीप पाटील )

( चाळीसगाव प्रतिनिधी ) – – इनरव्हिल क्लब ऑफ संगम चाळीसगाव ने छञपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने महिला व विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करुन जयंती साजरी केली . ईच्छादेवी नगर ,हिरापूर रोडच्या बाजूला ,” कैवल्य नगर , रुद्रहनुमान मंदिराजवळ ” मंडप टाकून राजांची जयंती साजरी केली .याप्रसंगी अध्यक्षस्थानी जिजाऊ समितीच्या तालुकाध्यक्ष , राष्ट्रवादी कॉग्रेस तालुकाध्यक्ष सौ – सोनल साळुंखे ह्या होत्या .प्रथम दिपप्रज्वलन सौ. सोनल साळुंखे , श्रीमती चंद्रकला साळुंखे ,सौ .श्रध्दा ठाकूर ,सौ सुनिता भोसले , सौ .लतिका पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
भास्कराचार्य इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिवगर्जना ( गारद ) करत ढोल , ताशे व तुतारी च्या गजरात कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .छोट्या बाळाला बालशिवाजी रुपात फुलांनी सजवलेल्या पाळण्यात घालून शिवजन्माचा पाळणा महिलांनी म्हटला व पुढील स्पर्धांना सुरुवात करण्यात आली .1 ) रांगोळी स्पर्धा 2) वकृत्व 3) शिवाजीविषयींचे विचार 4 ) नृत्य अश्या स्पर्धा घेण्यात आल्या .ह्या स्पर्धांमध्ये प्रत्येक स्पर्धेचे 3 नंबर काढण्यात आलेत रांगोळी 1)स्नेहल भारत 2)समिक्षा प्रकाश पाटील 3)वैष्णवी लक्ष्मण कदम उत्तेजनार्थ- 1) तनुष्का नितिन पाटील 2)भैरवी किशोर भोसले वकृत्व स्पर्धा -1)श्रेया कैलास पवार 2) पूर्वा ईश्वरलाल तंवर 3) आर्या नृत्य स्पर्धा 1)विर भोसले 2) उज्वल जंजाळे 3)मुनेश सोनवणे 3) जान्हवी उमाकांत ठाकूर व श्रावणी उमाकांत ठाकूर ग्रुप मध्ये 3 रा नंबर .चिञकला स्पर्धा – 1) समिक्षा प्रकाश पाटील 2)लावण्या उमेश मोरे 3 ) आर्या दिनेश सोनवणे गायण – महेश्वरी सुनिल बागल उत्तेजनार्थ – पूर्वा महादेव ह्या विजयी स्पर्धकांना सर्टिफिकेट व बुकस् ( शिवाजीमहाराज ) बक्षीस म्हणून देण्यात आले .सौ संयोगिता शुक्ल मॕडम यांनी छञपती विषयी विशेष माहिती कृतीतून सादर करुन पोवाडा गायण केले .म्हणून त्यांचा अध्यक्ष चंद्रकला साळुंखे यांनी विशेष सत्कार केला .तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या आई व पत्नी यांचाही अध्यक्षांनी सत्कार केला. सौ सोनल साळुंखे अध्यक्षिय मनोगत व्यक्त करत छञपतीचे विचार सर्वासमोर मांडलेत .
कार्यक्रमाच्या कोऑर्डिनेटर म्हणून सौ सुनिता भोसले यांनी काम पाहिले .त्यांना भारतीताई , सिमाताई व सुलोचनाताई यांनी मोलाचे सहकार्य केले. शेवटी आभार सौ श्रध्दा ठाकूर यांनी मानले.श्रीम सुनिता अहिरे , आरती अहिरे , गायञी चौधरी सदस्या व खूप मोठ्या संख्येने महिला व विद्यार्थ्यां मुले – मुली कार्यक्रमास हजर होती .अश्या पध्दतीने उत्साहाने महाराजांची जयंती साजरी करण्यात आली .शेवटी सगळ्यांना खाऊची वाटप करुन सांगता झाली .

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!