चालू वर्षात एप्रिल ते जून तिमाहीत सोन्याच्या आयातीत 76 टनची वाढ

मुंबई प्रतिनिधी

29 जुलै

कोरोनाच्या संकटातही देशातील सोन्याची मागणी वाढत असल्याची माहिती समोर येत आहे. चालू वर्षाच्या एप्रिल ते जून महिन्याच्या तिमाहीत सोन्याची आयात 19.2 टक्क्यांनी वाढून 76.1 टन आहे. गतवर्षी टाळेबंदीमुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर परिणाम झाल्याचे जागतिक सुवर्ण परिषदने म्हटले आहे.

ट2 2021 हा सोन्याच्या मागणीबाबत माहिती देणारा अहवाल जागतिक सुवर्ण परिषेदेने जाहीर केला. या अहवालामध्ये चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत सोन्याची आयात वाढून 63.8 टन झाल्याचे नमूद केले आहे.

जागतिक सुवर्ण परिषदेचे प्रादेशिक सीईओ सोमसुंदरम पी. आर. म्हणाले, की एप्रिल ते जूनच्या तिमाहीत सोन्याची मागणी 23 टक्क्यांनी वाढून 32,810 कोटी रुपये आहे.

2020 च्या आर्थिक वर्षातील एप्रिल ते जूनच्या तिमाहीत सोन्याची मागणी ही 26,600 कोटी रुपये होती.

असे असले तरी कोरोनोच्या दुसर्‍या लाटेत तिमाहीदरम्यान सोन्याची मागणी ही 46 टक्क्यांनी कमी झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

2020 मध्ये पहिल्या सहामाहीत 157.6 टन सोन्याची मागणी होती. हे प्रमाण 2019 च्या पहिल्या सहामाहीत सोन्याची मागणी 46 टक्क्यांहून कमी होती.

तर 2015 ते 2019 मधील पहिल्या सहामाहीच्या तुलनेत 39 टक्क्यांनी कमी मागणी होती.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत अनेक भागांमध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे अनेक व्यवसायांवर परिणाम झाला होता.

ग-ाहकांचा विश्वास आणि व्यवसायाला मिळणारा प्रतिसाद हा कोरोनाच्या तिसर्‍या लाटेवर अवलंबून असल्याचे जागतिक सुवर्ण परिषदेचे प्रादेशिक सीईओ सोमसुंदरम पी. आर. यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!