पेट्रोलसह डिझेलच्या दरात पुन्हा 35 पैशांनी वाढ; श्रीनगर ते चेन्नई संपूर्ण देशात इंधनाने गाठली शंभरी
नवी दिल्ली,
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गुरुवारी प्रत्येकी 35 पैशांनी वाढल्या आहेत. सलग दुसर्या दिवशी इंधनाचे दर वाढले आहेत. या दरवाढीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने नवा उच्चांक गाठला आहे.
दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.54 रुपये आहे. तर मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 112.44 रुपये आहे. मुंबईत डिझेलचा दर प्रति लिटर 103.26 रुपये प्रति लिटर तर दिल्लीत डिझेलचा दर 95.27 रुपये प्रति लिटर आहे.
देशातील बहुतांश मोठ्या शहरांमध्ये डिझेलच्या किमती प्रति लिटर 100 रुपयांहून अधिक आहेत. श्रीनगरमध्ये डिझेलची किंमत प्रति लिटर 99.94 रुपये आहेत. तर चेन्नईमध्ये डिझेलची किंमत प्रति लिटर 99.59 रुपये आहे.
देशात सर्वाधिक पेट्रोलचे दर पाकिस्तान सीमेनजीक असलेल्या राजस्थानमधील गंगानगरमध्ये गंगानगरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 118.59 रुपये आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 109.41 रुपये आहे. विविध राज्यांमध्ये असलेल्या कराप्रमाणे इंधनाचे दर भिन्न आहेत.
11 महिन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सर्वाधिक
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 85 डॉलर आहेत. हे दर गेल्या 11 महिन्यांत सर्वाधिक आहेत. भारताला पेट्रोल आणि डिझेलच्या गरजेसाठी आयातीच्या तेल इंधनावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्याने देशातील सार्वजनिक तेल कंपन्यांकडून इंधनाचे दर वाढविण्यात येतात. दुसरीकडे केंद्र सरकारकडून इंधनावरील कराचे प्रमाण जास्त असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतो.