फक्त चार दिवसात रतन टाटांच्या एका कंपनी 1.20 लाख कोटींचे नुकसान; रिलायन्सला फायदा

मुंबई,

मागील आठवड्यात 4 दिवस शेअर बाजारात कामकाज झाले. दरम्यान, मार्केटच्या तेजीमुळे टाटा ग-ुपच्या सर्वच शेअर्सने दमदार उसळी घेतली. परंतु या सगळ्यांमध्ये अपवाद ठरला तो ऊण्एचा शेअर! या शेअरला फक्त चारच दिवसात 1.20 लाख कोटींचे नुकसान झाले. या उलट मुकेश अंबानी यांना चार दिवसात 18 हजार कोटींचा फायदा झाला. एकूणच फायद्याचा विचार केला तर मागील आठवड्यात गुंतवणूकदारांना 6 लाक कोटींचा फायदा झाला.

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसचे मोठे नुकसान झाले आहे.टीसीएसच्या शेअरमध्ये 350 रुपयांची घसरण नोंदवली गेली. याउलट टाटा ग-ुपच्या इतर शेअर्सने गुंतवणूकदारांची झोळी भरली आहे. सेंसेक्सने 61 हजाराचा टप्पा गाठल्याने जवळपास सर्वच सेक्टर्समधील शेअर्स तेजीत होते. परंतु टीसीएसच्या शेअरमध्ये घसरण झाल्याने मार्केट कॅप 1.2 लाख कोटींनी कमी दिसून आली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!