महागाईचा ’भडका’; आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमती कडाकल्या, एका लिटरसाठी किती रुपये ?

नवी दिल्ली,

पेट्रोल-डिझेल च्या किमती कमी होण्याचं नाव घेत नाहीत. देशाच्या राजधानीसह सर्वच प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोलच्या किमतींमध्ये प्रति लिटर 30 पैसे आणि डिझेलच्या किमतींमध्ये 35 पैशांची वाढ केली आहे. या वाढीनंतर दिल्लीत 1 लिटर पेट्रोलसाठी 103.54 रुपये आणि डिझेलसाठी 92.12 रुपये मोजावे लागणार आहेत. तर देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असणारं शहर मुंबईत पेट्रोलची किंमत 109.54 रुपये आणि डिझेलची किंमत 99.92 रुपये प्रति लीटर इतकी आहे.

गेल्या मंगळवारपासून पेट्रोलच्या किमतींमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली होती. या आठवड्यात केवळ दोन दिवस पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. याव्यतिरिक्त दरदिवशी यांच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. गेल्या 11 दिवसांमध्ये पेट्रोलच्या किमतींमध्ये 2.35 रुपयांची वाढ झाली आहे. तर डिझेल 3.50 रुपयांपर्यंत महागलं आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!