सीबीआयने खाजगी कंपनी, इतरांवर 1,528 कोटी रुपये बँक फसवणुकीचा मामला दाखल
नवी दिल्ली,
सीबीआयने आज (बुधवार) हिमाचल प्रदेशचे कांगडा आणि पोंटा साहिबमध्ये कथित रूपाने 16 बँकांना 1,528 कोटीचे नुकसान पोहचवण्याच्या आरोपात एक खाजगी कंपनी, त्याचे अधिकार आणि इतरांच्या परिसरांवर छापे मारले. संस्थेनुसार, दिल्ली स्थित खाजगी फर्म इंडियन टेक्नोमॅच, त्याचे सीएमडी, इतर खाजगी व्यक्ती आणि लोक सेवकांनी बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वात 16 बँकांच्या एक कांस्टोरियमला 1,528.05 कोटी रुपयाचा चूना लावण्यचाा कट रचला.
या कांस्टोरियममध्ये यूनियन बँक ऑफ इंडिया, आंध-ा बँक, पंजाब अॅण्ड सिंध बँक, इंडियन ओवरसीज बँक, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कापोर्रेशन बँक, एचडीएफसी बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, सारस्वत को-ऑपरेटिव बँक, स्टेट बँक पटियाला, यूको बँक, इलाहाबाद बँक, स्टँडर्ड चार्टर्ड बँक आणि डीबीएस बँक समाविष्ट आहे.
सीबीआयने आरोप लावला की लोखंड आणि अलोखंड धातुच्या निर्मितीत लागलेल्या खाजगी कंपनीने 2008 पासून 2013 पर्यंत 16 राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकांच्या कांस्टोरियमने कर्ज सुविधा आणि कर्ज प्राप्त केले.
वक्तव्यात सांगण्यात आले, आरोपीने कथित कृत्याच्या माध्यमाने बँकांना धोका देणे आणि कर्ज खात्याने पैसे काढण्याच्या ध्येयाने कथित रूपाने कट रचला आणि याप्रकारे बँकांच्या उपरोक्त कांस्टोरियमला 1,528.05 कोटी रुपयाचे नुकसान झाले.
खातेला मार्च 2014 पासून बँक ऑफ इंडियामध्ये एनपीएच्या रूपात वर्गीकृत केले गेले होते, नंतर बँकेद्वारे रेड फ्लॅग केले गेले आणि फेब-ुवारी 2016 मध्ये फसवणुक घोषित केली गेली होती.