वॉच टाइमिंगमध्ये टिकटॉकने यूटयूबला मागे टाकले
सॅन फ्रॉसिस्को,
शॉर्ट व्हिडीओ मेकिंग प्लेटफॉर्म टिकटॉकचे उपयोगकर्ते आता प्रत्येक महिन्याला यूटयूब उपयोगकर्त्यांच्या तुलनेत कंटेट पाहिण्यात जास्त वेळ घालवितात.
अॅप अॅनालिटिक्स फर्म अॅप एनीनुसार अमेरिकेत टिकटॉकने मागील वर्षी ऑगस्टमध्ये पहिल्यांदा यूटयूबला मागे टाकले आहे आणि जून 2021 पर्यंत त्यांच्या उपयोगकर्त्यांनी यूटयूबवर 22 तास आणि 40 मिनिटाच्या तुलनेत प्रति महिना 24 तासापेक्षा अधिक सामग-ी पाहिली आहे.
द वर्जच्या बातमीनुसार बि-टेनमध्ये हे अंतर अजून अधिक आहे. कारण टिकटॉकने मागील वर्षी मे महिन्यात यूटयूबला मागे सोडले होते. उपयोगकर्ते आता महिन्यात जवळपास 26 तास कंटेंट पाहतात तर यूटयूबवर हे 16 तासापेक्षा कमी आहे.
बातमीमध्ये सांगण्यात आले की आंकडयामध्ये फक्त अॅड्रोंइड फोनवरील दर्शकांची संख्या समिल आहे. यामुळे समग-पणे मोबाईल उपयोगकर्त्यांचे प्रतिनिधी होऊ शकत नाही.
यूटयूब अजूनही एकूणपणे खर्च केलेल्या वेळेमध्ये पुढे असून यामध्ये कोणताही संशय नाही . कारण त्यांचे दोन अब्ज उपयोगकर्त्यांच्या तुलनेत टिकटॉकचे जवळपास 700 दशलक्ष उपयोगकर्ते आहेत.
आयओएस उपयोगकर्ते आणि अॅप यूजर्सना वगळता चीनमध्ये डॉयिनचे नाव बदलून यूटयूब अजूनही सामाजीक आणि मनोरंजन अॅपमध्ये एंड्रॉइड फोनवर घालवलेल्या वेळेच्या प्रकरणात क्रमांक एकवर आहे. या वर्षाच्या पहिल्या सहामहिन्यात टिकटॉक बरोबर पाचव्या क्रमांकावर आहे.
अॅप एनीच्या आंकडेवारीनुसार जगभरामध्ये आयओएस आणि एंड्रोंइड दोनीहीमध्ये (चीनमधील एंड्रोइड उपयोगकर्त्यांना वगळता) यूटयूबवर यूजर्स अधिक पैसा खर्च करत आहेत.
मागील वर्षी भारत सरकारने चीनी कंपन्याद्वारा विकसीत 59 अॅपवर प्रतिबंध लावला आहे. यामध्ये बाइटडॉसच्या टिकटॉकचाही समावेश आहे. हे अॅप राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका निर्माण करणार्या हालचालींमध्ये सामिल होते या चिंतामुळे यावर बंदी घातली गेली होती.