गॅस सिलिंडरची 25 रुपयांनी दरवाढ; केंद्र सरकार महिलाविरोधी असल्याची काँग्रेसची टीका

नवी दिल्ली,

घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने काँग-ेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकार हे महिला विरोधी असल्याचे काँग-ेसने म्हटले आहे. गॅस सिलिंडरचे दर तातडीने मागे घ्यावेत, अशी काँग-ेसने मागणी केली आहे. घरगुती गॅस सिलिंडरचे दर बुधवारी 25 रुपयांनी वाढले आहेत.

काँग-ेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत पत्रकार परिषदेत म्हणाल्या, की एलपीजी गॅस सिलिंडरचे दर वाढविण्याचा निर्णय म्हणजे सरकारच्या महिलांविरोधातील नीतीचे प्रतिबिंब आहे. गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्याने महिलांना गायीचे शेण आणि जळाऊ लाकडाकडे पुन्हा जाण्यासाठी भाग पडणार आहे. हे महिलांच्या आरोग्यासाठी चांगले नाही. देशामध्ये आर्थिक संकट व बेरोजगारी असताना सरकारकडून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती वाढविण्यात येत आहेत. हे सरकार कशामुळे किमती कमी करू शकत नाही?

पंतप्रधान उज्जवला योजनेवर प्रश्नचिन्ह-

एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 600 रुपयांहून असू नये, अशी अपेक्षा काँग-ेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत अपेक्षा यांनी व्यक्त केली. लोकांना जास्त पैसे द्यायला भाग पाडून केंद्र सरकार हे नफेखोरी आणि खंडणीचे काम करत असल्याची त्यांनी टीकाही केली. पंतप्रधान उज्जवला योजनेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. ज्यांना 860 रुपयांचे गॅस सिलिंडर परवडू शकते, अशा किती लोकांना सरकारने एलपीजी कनेक्शन दिले आहे?

महिलांनी घराबाहेर येऊन थाळ्या वाजवाव्यात…

काँग-ेसच्या नेत्या अलका लांबा म्हणाल्या, की देशातील सर्व महिलांना माझी विनंती आहे. त्यांनी बाहेर येऊन थाळ्या वाजवाव्यात. जेणेकरून महागाई आणि बेरोजगारीमुळे थाळ्या रिकाम्या असल्याचा पंतप्रधानांना संदेश मिळेल. गॅस सिलिंडरचे दर तातडीने मागे घेऊन सामान्यांना त्वरित दिलासा द्यावा. सामान्यांचे घरगुती बजेट कोसळू नये, असे काँग-ेसने म्हटले आहे.

असे आहेत गॅस सिलिंडरचे दर-

घरगुती गॅस सिलिंडरचे दर बुधवारी 25 रुपयांनी वाढले आहेत. या दरवाढीमुळे दिल्लीत एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 860 रुपये आहे. तर कोलकात्यात 886, मुंबईत 860 तर चेन्नईत 875 रुपये गॅस सिलिंडरची किंमत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!