सामान्यांना दिलासा! सलग 25व्या दिवशीही नाही वाढले पेट्रोल-डिझेलचे दर
नवी दिल्ली,
पेट्रोल-डिझेलच्या आज गुरुवारी देखील वाढ झाली नाही आहे. गेल्या 25 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे. मात्र यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर कोणताही परिणाम झालेला नाही. क्रूड ऑॅइलच्या किंमती कमी होऊन देखील पेट्रोल-डिझेलचे दर कमी झालेले नाहीत. घ्ध्ण्थ् च्या वेबसाइटनुसार, मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 107.83 रुपये प्रति लीटर तर डिझेलचे दर 97.45 रुपये प्रति लीटर आहेत.
मे महिन्यानंतर सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ पाहायला मिळाली होती. मात्र त्यानंतर आता 25 दिवस पेट्रोल आणि डिझेलचे स्थिर आहेत. त्याआधी 42 दिवस झालेल्या इंधनवाढीबाबत बोलायचे झाले कर, पेट्रोल जवळपास 11.52 रुपये प्रति लीटरने महागले होते. तर डिझेल 9.08 रुपये प्रति लीटरने महागले होते.
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात.