पेट्रोल-डिझेलच्या दराने गाठली ऐतिहासिक उंची, आजचे दर
मुंबई प्रतिनिधी
पेट्रोल-डिझेलच्या दराचा सामान्यांच्या खिशावर मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे सामान्यांच्या नजरा इंधनाच्या दराकडे असतात. 10 ऑगस्ट रोजी पेट्रोल-डिझेलचा दर जाहीर करण्यात आला आहे. 23 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताच बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या दरात कोणताच बदल झालेला नाही.
1 मेनंतर सलग 41 दिवस पेट्रोलच्या दरात वाढ झाली. मात्र 51 दिवस पेट्रोलच्या दरात कोणताच बदल झालेला नाही. दिल्लीत पेट्रोलचा दर 41 दिवसांत 11.44 रुपयांनी वाढल आहे. डिझेलचा दर 09.14 रुपये प्रती लीटर वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दराने रेकॉर्ड गाठला आहे.
दिल्लीत पेट्रोल 101.84 रुपये आणि डिझेल 89.87 रुपये प्रती लीटर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 107.83 रुपये प्रती लीटर आहे. तर डिझेलचा दर 97.45 आहे. कोलकाता आणि चेन्नईत पेट्रोलचा दर क्रमश: 102.08 रुपये आणि 102.49 रुपये प्रती लीटर आहे. या दोन्ही शहरात डिझेलचा दर क्रमश: 93.02 आणि 94.39 रुपये प्रती लीटर आहे.
मिजोरम सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, 12, 8 आणि 6 चाकी वाहनांना 50 लीटर इंधन मिळणार आहे. मीडियम मोटर व्हीकल सारख्या पिकअप ट्रकला 20 लीटर इंधन मिळणार आहे. यासोबतच स्कूटरला 3 लीटर तर बाइकला 5 लीटर आणि कारला 10 लीटर इंधन मिळणार आहे.
पेट्रोल पंपांना दिले महत्वाचे आदेश देण्यात आले आहेत. आसामसोबत सीमा वाद सुरू आहे. या वादाचा परिणाम मिझोरममध्ये पोहोचणार्या अन्नपदार्थ आणि इतर गोष्टींवर होत आहे. सगळ्या पेट्रोल पंपांना आदेश देण्यात आलेत की, मापातच वाहनांना इंधन द्यावं.
काळाबाजार रोखण्यासाठी उचललं मोठं पाऊल उचललं आहे. मिझोरम सरकारने आदेश दिले आहेत की,कुणालाही कंटेनरमध्ये पेट्रोल अथवा डिझेल भरू दिलं जाणार नाही. जे वाहन पेट्रोल पंपावर येईल त्यालाच इंधन दिलं जाईल. ज्यामुळे इंधनाचा काळाबाजार रोखला जाईल.