ईडीने फ्लिपकार्ट बरोबरच अ‍ॅमेझॉनलाही नोटिस पाठवली पाहिजे – खंडेलवाल

नवी दिल्ली प्रतिनिधी

8ऑगस्ट

प्रवर्तन निदेशालय (ईडी) ने फ्लिपकार्टला पाठविलेली नोटिस ही एक बहुप्रतिक्षीत योग्य पाऊल असून अशाच प्रकारेची नोटिस अ‍ॅमेझॉनलाही पाठविली पाहिजे अशी मागणी कन्फेडरेशन ऑफ ऑल इडिया ट्रेडर्स (कॅट) चे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी केली.

प्रवर्तन निदेशालय (ईडी) ने विदेशी मुद्रा नियमांच्या कथीत उल्लंघनावर ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट आणि त्यांच्या संस्थापकांना नोटिस प्रसिध्द केली आहे.

खंडेलवाल म्हणाले की अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट दोघेही आप आपल्या मार्केटप्लेसवर प्राधान्याने एक विक्रेता प्रणालीचे संचालन करत आहेत. जे कॉमर्स धोरणातील एफडीआयच्या विरुध्द आहे यासाठी दिर्घकाळा पासून कॅट आपला आवाज उठवत राहिला आहे. आम्ही ईडीकडे अ‍ॅमेझॉनलाही अशाच प्रकारची एक नोटिस पाठविण्याची मागणी करत आहोत कारण अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट दोघेही एकाच नौकेत बसलेले आहेत.

कॅटने ईडीच्या या पावलांची प्रशवंसा केली आणि म्हटले की 2016-2021 च्या दरम्यान अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट दोघांनीही केलेल्या कायद्यांचे उल्लंघनाचा तपास केला गेला पाहिजे.

खंडेलवाल यांनी म्हटले की ईडने फक्त मोठा दंडच नव्हे तर अ‍ॅमेझान आणि फ्लिपकार्टलच्या पोर्टलवर जो पर्यंत ते एफडीआय कायद्यांचे पालन करत नाहीत तो पर्यंत प्रतिबंध लावण्याची शिफारस केली पाहिजे.

त्यानी म्हटले की ई-कॉमर्स धोरणात एफडीआयच्या अंतर्गत विदेशी वित्त पोषीत कंपन्या फक्त तंत्रज्ञान सुविधा प्रदान करणार्‍या बाजाराच्या रुपात कार्य करु शकते आणि प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे माल विकू शकत नाही. तर या कंपन्या इन्व्हेंट्री मोडमध्ये काम करत राहिल्या होत्या.

ईडीने विदेशी मुद्रा उल्लंघन प्रकरणात फ्लिपकार्ट, त्यांचे संस्थापक आणि नऊ अन्य जणांना नोटिस प्रसिध्द केली आहे. ईडीच्या सूत्रानुसार नोटिसमध्ये त्यांनी हे स्पष्ट करण्यास सांगितले आहे की विदेशी गुंतवणुक कायद्याच्या कथीत उल्लंघनासाठी त्यानी 1.35 अब्ज डॉलरचा दंडाचा सामना कशामुळे केला नाही पाहिजे.

सूत्रांनी सांगितले की फ्लिपकार्ट आणि त्यांची सिंगापूरमधील एकासह अन्य होल्डिंग फर्मोनी 2009 आणि 2015 च्या दरम्यान विदेशी गुंतवणुक आकर्षीत करत विदेशी मुद्रा मॅगमेनेट अधिनियम (फेमा) चे उल्लंघन केले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!