देशात तीन आठवडयांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये कोणताही बदल नाही

नवी दिल्ली प्रतिनिधी

6ऑगस्ट

जागतीकस्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये होत असलेल्या चढ-उताराच्या दरम्यान काळाची वाट पाहण्याचे धोरण सुरु राहिल्याच्या कारणामुळे तेल वितरण कंपन्यांनी शुक्रवारी सलग 20 व्या दिवशीही किंमतींमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत.

जुलैमध्ये जागतीकस्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती 70 डॉलर प्रति बॅरलच्या खालच्यास्तरावर सुरु होऊन 77 डॉलर प्रति बॅरल पर्यंत पोहचल्या आणि नंतर महिन्यात 70 डॉलर प्रति बॅरलच्या खाली आल्या व परत 75 डॉलर प्रति बॅरल पर्यंत गेल्या आहेत.

तेल वितरण कंपन्यांद्वारा किंमतींमध्ये कोणतीही वाढ न केल्या गेल्याने राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल 101.84  रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.87 रुपये प्रति लिटरच्या अपरिवर्तीत किंमतीना विकले जात आहे. इंधनाच्या या किंमती 18 जुलै पासून स्थिर आहेत.

मुंबई शहरामध्ये 29 मेला पहिल्यांदा पेट्रोल 100 रुपयांच्या पुढे गेले आणि सध्या याची किंमत 107.83 रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत 97.45 रुपये आहे जी देशातील सर्व महानगरांपेक्षा जास्त आहे.

देशातील सर्व महानगरांमध्ये पेट्रोलची किंमत आता 100 रुपये प्रति लिटरच्या पुढे गेल्या आहेत. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.49 रुपये, कोलकातामध्ये 101.08 रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे. डिझेलही या दोनीही शहरांमध्ये अनुक्रमे 94.39 रुपये आणि 93.02 रुपये प्रति लिटर आहेत.

चालू आर्थिक वर्षात इंधनाच्या किंमतीमध्ये सलग 41 दिवस वाढ झाल्यानंतर आता स्थिर झाल्या आहेत. या वाढीमुळे दिल्लीत पे्ट्रोलच्या किंमतीमध्ये 11.44 रुपये प्रति लिटरने वाढ झाली. तर डिझेंलच्या किंमतीमध्ये 9.14 रुपये प्रति लिटरची वाढ झाली आहे.

दोनीही इंधन किंमतीे एप्रिलमध्ये फक्त एक वेळा 16 व 14 पैसे लिटरने कमी झाल्या. दिल्लीत 12 जुलैला डिझेलच्या किंमतीमध्ये 16 पैसे प्रति लिटरने कमी करण्यात आली होती.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!