बहुजनांचा सन्मानास भीम आर्मी मैदानात -भुसावळ भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेच्या जिल्हा संघटक पदी निवड…
दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी प्रशांत पाटील.
भुसावळ भीम आर्मी चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रफुल्ल शेंडे यांच्या हस्ते फुलगाव येथील योगेश भालेराव यांची जिल्हा संघटक पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांची निवड होताच जळगाव जिल्ह्यांमधून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे
अध्यक्ष हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर असताना जिल्ह्याचा आढावा घेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शनापर आदेश सूचना पारित करण्यात आलेल्या आहे जिल्ह्यातील तरुणांना भीम आर्मी संघटनेची ओढ निर्माण होत आहे
भीम आर्मी ही संघटना महापुरुष महात्मा ज्योतिबा फुले भीमरावजी आंबेडकर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी प्रामाणिक राहून संविधानाच्या मार्गावर चालणारी अन्याय अत्याचार शोषित पीडित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठीच या संघटनेची स्थापना करण्यात आली असून देशातील प्रत्येक नागरिकाला न्याय हा मिळवून देणारच असे भीम आर्मी चे पदाधिकारी व सदस्यांनी वचन दिलेले आहे.
ज्याप्रमाणे महापुरुषांनी जातीभेद न करता प्रत्येक समाजाचा उद्धार व्हावा ह्या दृष्टिकोन ठेवूनच त्यांनी या भारत देशाची सेवा करत आपल्या प्राणाची आहुती देत इतिहास घडवून आज ते महापुरुष प्रत्येक व्यक्तीच्या स्मरणात असून भारत देश हा त्यांच्या विचारांवर मार्गदर्शनावर संविधानावर या देशाचे दैनंदिन कामकाज सुरू आहे.
अशा महापुरुषांना वंदन करून भीम आर्मी चे पदाधिकारी व सदस्य आपल्या जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना लोकशाही मार्गाने न्याय मिळवून देण्याचे कार्य हे हाती घेतलेले आहे.
भीम आर्मी चे जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य रमाकांत तायडे जिल्हा महासचिव श्रींकात वानखेडे व प्रचार प्रसिध्दी प्रमुख यांनी दिपनगर औष्णिक विद्युत केंद्र येथील अस्थायी कामगारांचा शासन नियमानुसार पगार वाढ बाबत विषय हाताळत वेळ प्रसंगी आंदोलन ही करण्यात आलेले होते.
या आंदोलनात अस्थायी कर्मचारी एकजुटीने भीम आर्मी च्या माध्यमातून झोपेचे सोंग घेतलेल्या शासनाला महापुरुषांच्या नावाची जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे तातडीने शासन जागे होत तेथील अस्थाई कर्मचारी यांना पगार वाढ करत न्याय मिळवून देण्याचे महान कार्य केले आहे.
भीम आर्मी संघटना ही सर्व समाज बांधवांसाठी लढणारी संघटना असून
जिथे अन्याय अत्याचार होत असेल तेथे भीम आर्मी धडक देणारच असे कळविण्यात आले आहे.