ऑडनस फॅक्टरी वरणगाव येथील अस्थाई क्लर्क भरतीत भ्रष्टाचार होण्याची उपस्थित केली शंका

✍🏻 दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ तालुका प्रतिनिधी प्रशांत पाटील

भुसावळ तालुका ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव गोळा बारुद फॅक्टरी येथे अस्थायी क्लर्क पदावर भरती केल्यास भ्रष्टाचार होऊ शकतो

सविस्तर माहिती
वरणगाव फॅक्टरी येथील भारतीय मजदूर संघ युनियनने अस्थायी भरतीविषयी शंका उपस्थित करून आयुध निर्माणी येथील महाप्रबंधक यांना निवेदन देऊन अस्थायी क्लर्क भरती ही थांबविण्यात यावी भारत सरकार रक्षा मंत्रालय ऑडनस फॅक्टरी मध्ये पूर्वी क्लर्क भरती ही बारावी पास व योग्य तो कंप्यूटर कोर्स असलेल्यांना एम्प्लॉयमेंट मध्ये जाहिरात देऊन भरती केली जात होती
व आजच्या स्थितीत हीच भरती अस्थायी स्वरूपात भरण्यात येत असून या साठी शिक्षणाची अट ही पदवी ठेवण्यात आली आहे क्लर्कस्टॉप हे आयुध निर्माणी मधील गोपनीयतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे
तसेच ग्रुप सी भरतीमध्ये मुलाखत घेणे हे बंद झाले असून
मुळातच अस्थाई भरती ची मुलाखत ही कोणत्या शासन नियमानुसार घेतली जात आहे यासंबंधीत काही जी आर आहे का व असल्यास तो जाहिर करण्यात यावा
अस्थाई क्लर्क भरती न करता रखडलेल्या अनुकंपा तत्त्वावरील भरती करुन त्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे असे सुज्ञ नागरिकांत बोलले जात आहे
अशा प्रकारे अस्थाई भरती करणे हे प्रशासनाचे किती प्रमाणात योग्य आहे

अस्थाई क्लर्क भरती रद्द करावी
अशी मागणी भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाने
या महामंत्री भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ कानपूर
उप श्रम कल्याण आयुक्त केंद्रीय आयुध निर्माणी वरणगाव यांना निवेदनाद्वारे केली आहे

✍🏻दैनिक “महाराष्ट्र सारथी”*
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण आपल्या परिसरातील बातमी 95940 47437 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपण आपल्या नावाने बातमी दिल्यास आमच्या दैनिक मध्ये प्रसिद्धी केली जाईल.
आपला विश्वासू
प्रशांत पाटील
भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
95940 47437

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!