जळगाव- भुसावळ रेल्वे प्रवास होणार सुखाचा आता मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांतील प्रवाशांना वेळेत प्रवास पूर्ण करता येणार आहे.

दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी प्रशांत पाटील

जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना आता मोठा दिलासा मिळणार आहे . बहुप्रतीक्षित जळगाव आणि भुसावळ दरम्यान असलेल्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे लाईनचं काम आता पूर्ण झालं आहे. या लाईनचं कमीशन ऑफ रेल्वे सेफ्टी (CRS) ही पूर्ण करण्यात आलं आहे. या लाईनला आता मंजुरी देण्यात आली आहे.  त्यामुळे आता मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांतील प्रवाशांना वेळेत प्रवास पूर्ण करता येणार आहे.

उधना ते जळगाव दरम्यान 360 किलोमीटरच्या मार्गाचं डबलिंग पूर्ण झालं आहे, त्यामुळे गाड्यांचा वेग वाढला आहे, तरीही सुरतकडे जाणार्‍या ताप्ती मार्गाच्या गाड्या उशिरा येत होत्या. मात्र  ही समस्या आता संपणार आहे. जळगाव आणि भुसावळ दरम्यान असलेल्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे लाईनचं काम आता पूर्ण झालं आहे. यातून सुरतकडे येणार्या तब्बल 40 गाड्यांना जळगावहून वेगळा मार्ग मिळणार आहे.

भुसावळ-जळगाव दरम्यान 35 किमीच्या तिसरा-चौथा मार्ग सुरू केल्यामुळे नाशिक-मुंबई मार्गावर आणि ताप्ती मार्गावरील गाड्यांना वेगळा मार्ग मिळाला आहे. आता उधना-पालधी मेमू जळगाव किंवा भुसावळपर्यंत आणण्याची योजना आहे. अमरावती आणि खानदेश एक्सप्रेस देखील नियमित करण्याचं नियोजन आहे
या तिसऱ्या आणि चौथ्या लाईनमुळे प्रवाशांचे हाल होणार नाहीये. तसंच तासंतास रेल्वे थांबण्याऐवजी प्रवास लवकरात लवकर आणि सुरळीत होणार आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!