लाडकूबाई विद्या मंदिर भडगाव येथे आषाढी एकादशी निमित्त “वारी पंढरीची” हा ऑनलाइन सोहळा उत्साहात संपन्न..
आषाढी एकादशी निमित्त व कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर वारी पंढरीची हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
भडगाव- दि २० जुलै २०२१ रोजी कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव संचलित ला वि मंदिर व दादासाहेब सु मा पाटील कनिष्ठ महाविद्यालय भडगाव येथे आषाढी एकादशी निमित्त कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर वारी पंढरीची हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात जवळपास ३५-४० विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे भक्ती गिते, विठ्ठल रुक्मिणी व वारकरी वेशभुषा तसेच श्लोक, अभंग आणि नृत्य यांचे सादरीकरण करुन सहभाग नोंदवला. त्याचप्रमाणे भडगाव शहरातील प्रसिद्ध महिला कीर्तनकार धनश्री ताई शिंदे यांनी सहभागी होऊन आषाढी एकादशी चे महत्त्व सांगून मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्राचार्या श्रीमती वैशाली ताई पाटील मॅडम यांनी भूषविले. तसेच विद्यालयाचे उपप्राचार्य श्री ए एस पाटील सर व पर्यवेक्षक श्री आर डी महाजन सर व पालक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर प्रसंगी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधु भगिनी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहशालेय समिती सदस्य व्ही एस पाटील सर, एन एन पाटील सर, ए बी भदाणे सर, मंजुषा बागल मॅडम, जागृती शिसोदे मॅडम यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री व्ही एस पाटील सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री दिपक भोसले सर यांनी केले.