श्रीखंडेराव मंदिर व श्रीदत्त मंदिरास भाविकांसाठी बाक देऊन शिक्षकेतर कर्मचारी विठ्ठल सोनवणेंनी जपली सामाजिक बांधिलकी….
भडगाव प्रतिनिधी – ( राजू दिक्षीत )
जिकडे-तिकडे स्वार्थी प्रवृत्ती बोकाळत चालली असताना आपण देशासाठी,समाजासाठी काहीतरी देणे लागतो,ही भावना मनात ठेऊन समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न म्हणून कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,गोपीचंद पुना पाटील,विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथील शिक्षकेतर कर्मचारी असलेले विठ्ठल कृष्णा सोनवणे यांनी आपल्या मुळगावी शिंदी ता.भडगाव येथील पुरातनकालीन ऐतिहासिक वारसा लाभलेल्या श्री खंडेराव मंदिरासाठी दोन तसेच गावातील श्रीदत्त मंदिरासाठी दोन असे एकूण चार सिमेंट – क्रॉंक्रीटचे बाक आपले दिवंगत वडील कै.कृष्णा पिराजी सोनवणे यांच्या स्मरणार्थ सप्रेम भेट म्हणून गावातील काही मोजक्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सुपूर्द केले.
एकीकडे स्वार्थापोटी गोर-गरीबांना लुटून भ्रष्टाचार करणाऱ्यांना तसेच आपली वासना पूर्ण करण्यासाठी रंगीत-संगीत पार्ट्या झोडपणाऱ्यांना ही मोठी चपराक असून विठ्ठल सोनवणे व त्यांच्या कुटूंबातील सदस्यांनी सामाजिक ऋण फेडण्याच्या दृष्टीने केलेल्या दातृत्वाचे पंचक्रोशीत कौतुक केले जात आहे.
यावेळी प्रकाश महाजन,प्रभाकर पाटील,मधुकर पाटील,भगवान पाटील,धनराज धोणे,जयप्रकाश पाटील,देविदास महाजन आदि गावकरी उपस्थित होते.