वाडे येथे उत्तर महाराष्टृ कलावंतांचा मेळावा. भव्य शोभायात्रा
भडगाव – तालुका प्रतिनिधी ( राजू दिक्षित )
लोककला आर्थिक विकास मंडळ स्थापन करावे. लोककलावंतांचा सामाजीक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक असा सर्वांगीण विकास करावा. लोककलेची नोंदणी सांस्कृतिक विभागात करावी. लोककलावंतांना ५ हजार रुपये पेन्शन मिळावी. बेघर कलावंतांना बेघर मिळावे. लोककलावंतांच्या मुलांना शासनाने नोकरी दयावी. शासनाने कलावंतांच्या मुलांचा शैक्षणिक खर्च करावा. लोककलावंतांच्या यासह विविध मागण्या शासनाने मंजुर कराव्यात . अन्यथा विधानभवनावर जागरण गोंधळ करण्यात येईल. कलावंतांना न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न करु. असा इशारा व मार्गदर्शन करतांना जेजुरी मल्हार गडाचे विश्वस्त व वाघ्या मुरळी परीषदेचे मुख्य संस्थापक मार्तंड साठे यांनी वाडे येथील कार्यक्रमात केले. ते भडगाव तालुक्यातील वाडे येथे आयोजीत उत्तर महाराष्टृ लोककलावंतांचा मेळावा या कार्यक्रमात बोलत होते. येळ कोट येळ कोट जय मल्हार अशा घोषणा देण्यात आल्या. लोककलावंतांनी लोकगितांचा जागर अन सवादय मिरवणुक खास आकर्षण ठरली. जेजुरी गडाचे विश्वस्त मार्तंड साठे यांचे वाडे गावात आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी व पुष्पवृष्टी करण्यात आली. मिरवणुकीत नागरीक, महिला बालकांनी जेजुरी गडाचे विश्वस्त मार्तंड साठे यांचे दर्शन घेतले. यावेळी जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद, जिल्हयातील विविध कलाक्षेञातीरल संख्य कलावंत मंडळे या कार्यक्रमात सहभागी होते. हा कार्यक्रम दि. ११ रोजी वाडे येथील संत सावता महाराज मंगल कार्यालयात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन वाडे येथील सरस्वती वही मंडळ व ग्रामस्थ यांनी केले होते. यावेळी व्यासपिठावर जेजुरी मल्हार गडाचे विश्वस्त व वाघ्या मुरळी परीषदेचे मुख्य संस्थापक मार्तंड साठे, प्रदेश अध्यक्ष महेंद्र गुरव, उपाध्यक्ष महिंद्र अहिरे, कलावंत मानधन समिती अध्यक्ष हभप. गजानन महाराज वरसाडेकर, राज्य संघटक दादा बाबर, राज्य मुख्य कार्यकारी सदस्य ज्ञानेश्वर शिंदे,राज्य सरचिटणीस राहुल आहेर, सरचिटणीस आण्णाभाऊ राठोड, कजगाव वाडे जि प गटाच्या सदस्या किर्ती चित्ते, सरपंच रजुबाई पाटील, माजी उपसरपंच प्रभावती पाटील, श्री. हनुमान विकासोचे चेअरमन विश्वासराव पाटील, हभप. शिवाजी चित्ते, नेताजी सुभाष ग्राम वाचनालयाचे माजी व्हा. चेअरमन भावलाल परदेशी टेकवाडे, वाघ्या मुरळी परीषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश वाघ, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल सरदार,सचिव भाऊसाहेब पाटील, संघटक मुरलीधर अहिरे, अशोक कांबळे, नेमीचंद मोरे, धुळे जिल्हाध्यक्ष भिमराव मोरे, भडगाव तालुकाध्यक्ष संतोष मोरे, अनिल नन्नवरे, जिल्हा सल्लागार पोपट सोनवणे, संजय ठाकुर, पुणे मंगेश शिंदे , नेताजी सुभाष ग्राम वाचनालयाचे संचालक अशोक परदेशी, विकासोचे माजी संचालक अर्जुन माळी, हिलाल चौधरी, हभप. धर्मराज सोनार, बांबरुड प्र ब चे प्रेमसिंग भाट, पाचोरा तालुका अध्यक्ष मोहन लोहार,उपाध्यक्ष शिवाजी ठाकुर, चाळीसगाव तालुका सल्लागार गिरधर गोंधळी , रामदास अहिरे आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचलन शाहिर विठ्ठल महाजन, अरुण माळी यांनी तर आभार अशोक माळी यांनी मानले . सुरुवातीस मान्यवरांचे हस्ते प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. सुरुवातीला गावात गोंडगाव येथील नवतरुण वही मंडळ, जगदंबा वही मंडळ, वाडे येथील सरस्वती वही मंडळ, वाघ्या मुरळी मंडळ , कानबाई माता जागरण मंडळ,गोंधळ पार्टी, शाहिर अशा अनेक मंडळांनी सवादय लोकगिते गात उत्कृष्ट कला सादर केली. वाघ्या मुरळी परीषदेचे संस्थापक मार्तंड साठे पुढे बोलतांना म्हणाले कि, वाघ्या मुरळी परीषदेमार्फत मल्हार गडावर विदयार्थ्यांसाठी एम पी एस सी, यु पी एस सी आदि सेंटर सुरु केलेले आहे. विविध स्पर्धा परीक्षेत यश गाठुन विदयार्थ्यांनी चांगले अधिकारी बनावे. हा परीषदेचा मुख्य हेतु आहे. मुसळधार पाऊसाने घर कोसळत नाही. दारुच्या एका थेंबाने घर कोसळते. म्हणुन नागरीकांनी व्यसनापासुन दुर राहावे.निर्व्यसनी जिवन जगावे. पोराबाळांची काळजी घ्यावी. असा संदेशही मार्तंड साठे यांनी दिला. माणसाच्या आशा, अपेक्षा कधी मावळत नाहीत. संघटना कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहे. कलाकारांना न्याय देण्याचा प्रयत्न करु.असेही शेवटी वाघ्या मुरळी परीषदेचे संस्थापक मार्तंड साठे यांनी बोलतांना सांगीतले. नंतर हभप. गजानन महाराज वरसाडेकर यांनी मार्गदर्शन करतांना सांगीतले कि, गरीब कलाकार एकञ येउन ही संघटना स्थापन केली आहे. संघटना ही न्याय मिळवुन देण्याकरीता आहे. आम्हीही कलेला न्यान्याय देत आहोत.संघटनेच्या माध्यमातुन संघर्ष करत राहा. कलाकारांना आम्हि न्याय देण्याचा प्रयत्न करु.असेही हभप. गजानन महाराज वरसाडेकर यांनी सांगीतले, कार्यक्रम यशस्विततेसाठी वाडे अशोक माळी, अरुण माळी , गणेश सोनार, अर्जुन चौधरी, पांडुरंग वाघ, भुषण पाटील, पंडीत सोनवणे, तोताराम पाटील यांचेसह वाडे येथील सरस्वती वही मंडळ, वाघ्या मुरळी मंडळ व नागरीकांनी विशेष परीश्रम घेतले.
भडगाव वार्ताहर अशोक परदेशी यांना झुंजार पुरस्कार जाहीर —
भडगावचे वार्ताहर अशोक परदेशी यांच्या कार्याची दखल घेत त्यांना झुंजार पञकार पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे. त्यांना झुंझार पञकार पुरस्काराबाबत पञ पाठविण्यात येईल. तसेच अशोक परदेशी यांना जेजुरी गडावर सन्मानपञ देउन लवकरात लवकर पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. अशी घोषणा जेजुरी मल्हार गडाचे विश्वस्त व वाघ्या मुरळी परीषदेचे मुख्य संस्थापक मार्तंड साठे यांनी या कार्यक्रमात अशोक परदेशी यांना आशिर्वाद देत जाहीर केले.
____________________________________________________
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण भडगाव तालुक्यातील बातमी 9730002081 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
राजू दिक्षित
भडगाव तालुका प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-9730002081