एनगाव येथील ढाके विद्यालयाचे शिक्षक एम.पी.कोळींचा गौरव

भडगाव प्रतिनिधी- (रणजीत सोनवणे)

कोरोना ने जग थांबल पण,तो शिक्षक-शिक्षणाला थांबवू शकत नाही..या-शासनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन इंग्रजी विषयाचे ज्ञान हे आपल्या देशात नव्हे तर,शेजारिल राष्ट्रांशी शैक्षणिक सलोखा तयार व्हावा या हेतुन अतिशय सुंदर असा ग्लोबल उपक्रम सुरू झाला आणि तो यशस्वीरीत्या पार पडला. गेल्या ०१ वर्षांपासून सुरू असलेल्या India – Bangladesh English Tellecollboration Inter-natational project यशस्वी रित्या पार पडला.

सदर कार्यक्रम दि-२३ ऑक्टोंबर रोजी आर.एस.आदर्श विद्यालय, भुसावळ ता.भुसावळ येथे घेण्यात आला .जळगाव जिल्ह्यातील सर्व सहभागी शिक्षक, विद्यार्थी यांचा सत्कार समारंभ ETWAJ तर्फे आयोजित करण्यात आला होता.
प्रसंगी:-
१). डॉ.अनिल झोपे(सर)
प्रिंन्सीपल-Diet Jalgaon.
२). डॉ.चंद्रकांत साळुंखे (सर)
सीनिअर लेक्चरर.Diet Jalgaon
३). डॉ.शैलेश पाटील
लेक्चरर. डा.एट.जळगाव.
आदर्श हायस्कूल भुसावळ चे मा.चेअरमन , सेक्रेटरी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
श्री.भरत शिरसाठ:-President:-ETWAJ-jalgaon
इंडीया-बांगलादेश (co-ordinotor)
श्री.प्रमोद आठवले (सर) व्हा-प्रेसिडेंन्ट (ETWAJ) सेक्रेटरी गणेश बच्छाव खजिनदार एम आर चौधरी, टी बी पांढरे ,एक्झिक्युटिव्ह मेम्बर (ETWAJ) रणजित सोनवणे, संजय बारी, सरिता वासवानी वास्कर सर, मोहन चव्हाण, संगीता भोसले, सरला ढगे, सपना रावलानी, शंकर भामेरे, ज्ञानेश्वर पाटील, रावसाहेब जगताप प्रवीण मोरे, बी. एन पाटील, हे मान्यवर उपस्थित होते. या प्रोजेक्ट च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या व बांगलादेशी शिक्षक-शिक्षिकांशी एक अनामिक असे नाते तयार झाले..बर्याच गोष्टी शिकायला मिळाल्या..भाषेतील नाविण्य शिकण्यास मिळाले..हा शैक्षणिक प्रवास व अनुभव आम्हाला नेहमीच आनंदात ठेवेल. असे मत शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.यातून आम्हाला एक ऊर्मि/उमेद व नविन काही तरी करण्याची आशा जागृत झाली.. असे मत शिक्षकांनी व्यक्त केले.. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत एम पी कोळी यांचा सत्कार मेडल व सन्मानपत्र देऊन करण्यात आला.
ढाके विद्यालयाचे चेअरमन संचालक मंडळ यांनी एम.पी.कोळी यांचे अभिनंदन केले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!