महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत पंचायत समिती भडगाव येथे गिरणाई महोत्सव 2021चे उत्साहपूर्ण यशस्वी रित्या आयोजन- आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
भडगाव – तालुका प्रतिनिधी ( राजू दिक्षित )
उमेद अभियान खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील महिलांकरीता कल्याणकारी असून महिला कर्ज वेळेवर परतफेड करून आपल्या कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यास मदत करीत आहे असे प्रतिपादन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले.
ग्रामीण भागातील बचत गटातील महिलांनी फक्त बचत गट व कर्ज एवढे मर्यादित न राहता सांस्कृतिक कार्यक्रमात उस्फूर्तपणे सहभाग घेऊन जगण्याचा निखळ आनंद लुटावा हा या महोत्सवाचा उद्देश आहे असे प्रतिपादन डॉक्टर अर्चनाताई पाटील सभापती यांनी व्यक्त केले
सदर महोत्सवात महिला बचत गटांना 5 कोटी रु कर्ज वाटप करण्यात आले. उमेद अभियानात कार्यरत करणारे सर्व प्रकारचे केडर यांचा सत्कार, महिलांकरीता विविध स्पर्धा रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, उखाणे स्पर्धा, मिसेस बचत गट स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री देखील आयोजन करण्यात आले. यामध्ये पुरणपोळी, भरीत भाकरी, हळद लिंबू लोणचे गांडूळखत, गृहोपयोगी वस्तू यांचे विविध 30 स्टॉल लावले होते व या माध्यमातून 2 लाखापेक्षा अधिक उलाढाल दिवसभरात पूर्ण झाली.
विनोद ढगे व त्यांच्या टीमने महिलांचे शासनाचे विविध अभियाना चे पथनाट्य सादर करीत महिलांचे मनोरंजन करीत प्रबोधन केले.
निराधार 5 महिलांना महसूल विभागतर्फे 20 हजार रुपयांचे चेक देण्यात आले.
सदर महोत्सव साठी प्रमुख पाहुणे सौ. सुनीताताई पाटील मा.नगराध्यक्षा पाचोरा, श्री मुकेश हिवाळे तहसीलदार,
राजेंद्र जिभु पाटील ,युवराज आबा पाटील,विकास तात्या पाटील, रामकृष्ण पाटील,जालिंदर चित्ते, सौ.स्नेहा कुडचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री गोरडे कृषी अधिकारी, श्री हरेश्वर भोई जिल्हा व्यवस्थापक उमेद जळगाव,
योजनताई पाटील,मंदाकिनी पाटील,सिमाताई पाटील,दीप्ती पाटील,मीना बाग,प्राचार्य सोनाली पाटील,रावण तात्या,डॉ.विशाल पाटील,डॉ. विलास पाटील,गणेश अण्णा परदेशी, योगेश गंजे,हर्षल पाटील,विजय दादा पाटील,रतन परदेशी, प्रताप महाजन,संभाजी भोसले ,पुरुषोत्तम माळी, परशुराम महाजन,मॅचिंद्र शार्दूल,उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन पं. स.सभापती डॉ.सौ.अर्चनाताई पाटील,गटविकास अधिकारी आर. ओ. वाघ साहेब,सहायक ग.वि. अधिकारी संजय लखवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ,उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक प्रशांत महाले , प्रभाग समन्वयक प्रशांत परदेशी व सचिन महाजन यांनी अथक परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन सुभाष उगले व दिलीप चिंचोले यांनी केले.
___________________________________________________
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण भडगाव तालुक्यातील बातमी 9730002081 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
राजू दिक्षित
भडगाव तालुका प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-9730002081