महिला दक्षता अध्यक्षा नगरसेविका योजना पाटील यांनी केली कोरोना प्रतिबंध लसीकरणाची जनजागृती..
भडगांव – तालुका प्रतिनिधी – ( राजू दिक्षित )
केंद्र व राज्य सरकार कोरोना प्रतिबंध लसीकरण कार्यक्रमांतर्गत आरोग्यविभाग व नगरपरिषद यांचे सहकार्याने पोलीस स्टेशन भडगांव महिला दक्षता अध्यक्षा नगरसेविका योजना पाटील यांनी ग्रीन पार्क वाय.एम.खान विद्यालयात स्थानिक रहिवाशांच्या मदतीने यशस्वी लसीकरण शिबिर घेऊन जनजागृती केली. लसीकरण उपक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन असंख्य युवक, युवती, महिला व नागरिकांनी लसिकरण करून घेतले. शुभारंभ प्रसंगी नगरसेविका योजना पाटील, हाजी जाकिर कुरेशी, हाजी मोहसिन शेख, सैय्यद कमरअली, याकूब खान पठाण, रिजवान खान, मोहसिन खान, रियाज सोनू शेख़, शोयब मिर्झा यांनी शिबिर यशस्वीतेसाठी उपस्थित आरोग्याधिकारी डॉ.सुचिता आकडे, न.प.कार्यालयीन अधिक्षक परमेश्वर तायडे, डॉ.प्रशांत पाटील, डॉ.अभिजित पाटील, डॉ.प्रतिक भोसले, आरोग्य व आंगणवाडी सेविका कल्पना पाटील, संगिता मोरे, सविता मराठे, सुनिता भोसले यांचे स्वागत करून लसिकरणास सहकार्य केले. लसीकरण शिबिर यशस्वीतेसाठी वाय.एम.खान शाळा समिती, ग्रीन पार्क परिसर रहिवाशी, आरोग्य विभाग, नगरपरिषद, पोलीस स्टेशन, आंगणवाडी सेविका यांचे आभार व्यक्त केले व यशस्वी लढा कोरानाशी यासाठी प्रत्येकाने लसिकरण करावे असे आवाहन नगरसेविका योजना पाटील यांनी केले आहे.
___________________________________________________
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण भडगाव तालुक्यातील बातमी 9730002081 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
राजू दिक्षित
भडगाव तालुका प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-9730002081