अंजनवहिरे येथे कुषीकन्या हर्षा पाटील यांचे शेतकरी बांधवाना शेती विषयावर मार्गदर्शन..
भडगाव – तालुका प्रतिनिधी -( राजू दिक्षित )
अंजंविहिरे येथे मराठा विद्याप्रसारक समाज संस्था संचालित कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील. कृषी महाविद्यालय या संस्था मार्फत ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत ..भडगाव तालुक्यातील अंजंविहिरे या गावात कृषी कन्या हर्षा पाटील यांनी अंजनवहिरे गावातील शेतकरी बांधवाना शेतात जाऊन त्यांच्या शी आधी संवाद साधुन त्यांना शेती माहिती सांगितली त्यासोबतच मका या पिकाची लावणी,औषधी फवारणी निंदणी, कोळपणी, खुळणी,कापणी तसेच मळणी व मका काढणी संदर्भात याबाबतीत माहिती दिली तसेच त्या मक्या ची त्याची साठवण व त्याची निगा कशी घ्यावी यासोबतच येणाऱ्या रब्बी हंगामात मका कोणत्या पध्दतीने लावणी करणे कोणते बियाणे घेणे त्यावर औषधी कोणत्या असे अमुल्य याबाबतीत मार्गदर्शन केले त्यावेळी शेतकरी बांधवान कुषी कन्या हर्षा पाटील यांच्या शी मनमोकळेपणाने चर्चा व संवाद साधला.या प्रसंगी गावातील बरेचशे शेतकरी शेत मजूर हजर होते. कुषीकन्या हर्षा पाटील यांनी विविध विषयांवर गावात मार्गदर्शन करत असल्याने त्यांचे गावातुन व तालुक्यात तुन कौतुक होत आहे जेव्हा शेतकरी बांधवान शी संवाद साधला त्यावेळी शेतकरी समाधानी होते यासाठी कार्या साठी महाविद्यालयाचे प्राचर्य. डॉ. आय. बी. चव्हाण. प्रा. एस. यू. सूर्यवंशी. प्रा . डॉ. ए. यू. कानडे. प्रा. एस . बी .सातपुते. प्रा. डॉ. के. के. सूर्यवंशी. प्रा. डॉ.डी.एस. शिंदे .यांचे मार्गदर्शन लाभले.
____________________________________________________
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण भडगाव तालुक्यातील बातमी 9730002081 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
राजू दिक्षित
भडगाव तालुका प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-9730002081