गो.पु. पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा…!!!!

भडगाव – तालुका प्रतिनिधी ( राजू दीक्षित )

कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचालीत गोपीचंद पुना पाटील,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथे नुकताच माजी राष्ट्रपती व थोर शास्त्रज्ञ दिवंगत डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम साहेब यांचा जन्मदिवस हा वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम विद्येची देवता,शारदा देवी,डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम व कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील, यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. इयत्ता १०वी ब चे विद्यार्थी,सचिन शिवशंकर महाजन व परीमल सतीश हिरे या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकातील बालपण व शिक्षण ही कथा वाचून दाखवली.श्री.ए.एस.कोळगावकर व श्री. सी.बी.भोसले यांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याविषयी मनोगत व्यक्त केलेत.विद्यार्थी जीवनात वाचनाचे महत्त्व व फायदे या संदर्भातील माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य सुनिल पाटील,यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून पटवून दिलेत.यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक,श्री.ए.एच.पवार ज्येष्ठ शिक्षक श्री.आर.एस.कुंभार उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एस.ए.वाघ यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनी यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!