भडगाव येथील नदीपात्रातील सराव मैदानातील होणारी वाळू चोरीला आळा घालून मैदानाची होणारी दुर्दशा थांबवावी यासाठी मैदानावर विविध भरती साठी सराव करणाऱ्या विद्यार्थ्यां कडून तहसीलदार मुकेश हिवाळे यांना निवेदन देण्यात आले..

भडगाव – तालुका प्रतिनिधी ( राजू दिक्षित )

गिरणा बंधाऱ्यापासून ते महादेव मंदिरापर्यंत रात्री बेरात्री तसेच दिवसासुद्धा वाळू चोरी होत आहे. त्यामुळे तेथे असणाऱ्या सराव मैदानाची देखील या वाळू चोरी तसेच वाहतुकी ने दुर्दशा होत आहे.
निवेदन देणारे आम्ही सर्व सुशिक्षित बेरोजगार असून या नदीपत्रातील मैदानात पोलीस भरती, सैन्य भरती आदी. विविध भरत्यासाठी रानींग व्यायाम इतर सराव करीत असतो. परंतु होणाऱ्या वाळू चोरी व अवैध वाहतुकीची मैदानावर सराव करणेही व्यवस्थित होत नाही तसेच निसर्गाचे देखील नुकसान होत आहे.
सदर वाळू चोरी तत्काळ थांबवावी व त्याठिकाणी रात्रीतून व दिवसातून गस्त वाढवावी अन्यथा आम्हाला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल.
निवेदनावर धनंजय महाजन, कुणाल पाटील, गणेश महाजन, महेंद्र माळी, प्रदिप पाटील, सोनू गंजे, रोहीत माळी, सचिन महाजन, शुभम महाजन, आदित्य पाटील, स्वप्निल महाजन, प्रणव सोनावणे, लीलाधर पाटील, कुणाल मोरे, भूषण महाजन, विवेक देसले, सौरभ पाटिल, सतीश गांगुर्डे, समर्थ पाटील, मयुर महाजन, मोहित शिरसाठ, रुपेश महाजन, अमोल पाटील, शुभम पाटील, दर्शन पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

_____________________________________________________

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण भडगाव तालुक्यातील बातमी 9730002081 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
राजू दिक्षित
भडगाव तालुका प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-9730002081

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!