दुर्गुणा वर विजयासाठी तुतारीची गगनभेदी..-प्रा. सुरेश कोळी
भडगाव – तालुका प्रतिनिधी – ( राजू दिक्षित )
भडगाव चे निसर्गरम्य परिसर अनेक काव्याना आमंत्रण देत होते अस्या रम्य परिसरात केशवसुत यांनी 30 कवीता लिहिल्या “दिवाळी” ही ८० ओळींची निसर्ग काव्य लिहिले.एक तुतारी द्या मज आणून ,या आक्रमक पवित्रा तर नवा शिपाई, सतारीचे बोल,म्हातारी,आई करिता शोक,घुबड,आम्ही कोण, या कविता त्यांच्या मनातील देशप्रेम व संत श्रद्धा दिसते. अंधश्रद्धा,कर्मकांड, या गोष्टी ना विरोध होता यातूनच तुतारी चा महिमा दिसून येतो,असे विचार प्रा.सुरेश कोळी यांनी मांडले . म. सा. प.पुणे शाखा भडगाव व माऊली फाऊंडेशन संचलित वडजी अभ्यासिका यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कवी वाल्मीक अहिरे वडजी हे होते कार्यक्रमाच्या प्रारंभी कवी केशवसुत यांच्या प्रतिमाचे पूजन करण्यात आले, यावेळी राहुल पाटील, श्रीकांत पाटील,जगदीश परदेशी,भावेश पाटील,
प्रशांत पाटील,सुमित पाटील,विकास पाटील,आकाश पवार, मनोज पाटील,नितीन, योगेश पाटील,कमलेश,,सागर,भूषण नेरपागर.यां विद्यार्थ्यानी सहकार्य केले. प्रास्ताविक श्री. अनिल पाटील यांनी तर आभारप्रदर्शन राहुल पाटील यांनी मानले.कवी वाल्मीक अहिरे यानी विद्यार्थ्याच्या कवी व लेखक यांची माहिती संक्षिप्त विषद केली.
_____________________________________________________
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण भडगाव तालुक्यातील बातमी 9730002081 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
राजू दिक्षित
भडगाव तालुका प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-9730002081