वडजी टी.आर.पाटील विद्यालय, इंग्लिश मेडिअम स्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात संस्थेचे संस्थापक कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील पुण्यस्मरण सप्ताह प्रारंभ
वडजी/भडगांव (प्रतिनिधी),
कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित, टी.आर.पाटील विद्यालय, इंग्लिश मेडिअम स्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात संस्थेचे संस्थापक कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांच्या २० व्या पुण्यस्मरण सप्ताह उद्घाटन समारंभ स्थानिक स्कुल कमिटी चेअरमन कैलास रामदास पाटील यांचे अध्यक्षतेखाली सदस्य भिकन अभिमन पाटील, प्राचार्य डी.डी.पाटील, प्र.प्राचार्य मा.सरपंच बी.वाय.पाटील, उपप्राचार्य ए.एस.पाटील, कनिष्ठ लिपिक मनीषा भोसले यांचे प्रमुख उपस्थितीत संस्थापक कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील सप्ताह व मातोश्री कमलताई हरी पाटील जयंती निमित्त, दिवंगत संचालक दादासो युवराज हरी पाटील, आण्णासो अशोक हरी पाटील, संचालिका साधनाताई पाटील, आराध्य दैवत देवी माता सरस्वती यांच्या प्रतिमा पूजनाने संपन्न झाला. प्रास्ताविकात विद्यालयाचे कलाशिक्षक वा.ए.पाटील यांनी कोरोना पार्श्वभूमिवर पर्यावरण रक्षण, आरोग्य स्वच्छ्ता तंभाखू मुक्ति शपथ दिली व कर्मवीर तात्याबाबांचे योगदान कार्य विशद केले. प्राचार्य डी.डी.पाटील यांनी विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील विद्यालयाची दुमजली इमारत, एस.एस.सी.बोर्ड मान्यता, 11 वी, 12 वी विज्ञान महाविद्यालय मान्यता मिळाल्याने वडजी विद्यालयातच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश मेडिअम, सेमी इंग्लिश व सायन्स महाविद्यालयाची सोय सुवर्ण महोत्सवी वर्ष व सेवा निवृत्ती वर्षात झाल्याचा मनःस्वी आंनद व्यक्त केला. पुण्यस्मरण सप्ताहनिमित्त लोकजागर कार्यक्रम भारुड चे आयोजन करण्यात आले. विद्यालयाचा माजी विद्यार्थी तुषार थोरात, संतोष मोरे, ज्ञानेश्वर ब्राम्हणे, बळीराम खैरे या लोककलावंतानी उत्कृष्ट असे भारुड, देशभक्तीपर, तसेच भावगीते व कोरोणा गीत, कर्मवीर तात्याबाबांच्या जीवनावर आधारीत पोवाडा सादर केला. यशस्वीतेसाठी सप्ताह नियोजन समिती प्रमुख जे.एच.पवार, विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक एस.जे. पाटील, ई.एम.पाटील, वरिष्ठ लिपिक दिलीप पाटील, डी.एम.पाटील, वाय.डी.भोसले सह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षेकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले. प्रसार माध्यम प्रमुख़ आर.एच.बोरसे, छायाचित्रण प्रा.संदीप पाटील, आभार एम.एस.देसले, समारोप आर.एम.पाटील यांनी केला. संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील, सचिव जिल्हा दूध संचालिका डॉ.पूनमताई पाटील, संचालक मंत्रालय सचिव प्रशांतराव पाटील, संचालिका कोकिलाताई पाटील, संचालिका जिजाताई सिसोदे, संचालक मा.नगराध्यक्ष श्यामकांत भोसले, संचालक इंजि.राहुल पाटील, मुख्याध्यापक समन्वयक कमलेश शिंदे, गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी, विस्ताराधिकारी गणेश पाटील, केंद्रप्रमुख संजय न्याहिदे, रविंद्र सोनवणे, मा.सभापती मनीषाताई पाटील, नगरसेविका योजनाताई पाटील आदि मान्यवरांनी शुभेच्छया दिल्या आहेत.