६ महिने उल्टुनही गारपीटग्रस्त शेतकर्यांना मदत नाही.

भडगाव वार्ताहर ( राजु दिक्षीत )

भडगांव तालुक्यातील बहुसंख्य गावा मध्ये २० ते २३ मार्च दरम्यान अवकाळी पाऊस व गारपिठीने शेतकऱ्यांचे कोट्यावधींचे नुकसान झाले होते . तहसीलदार, तलाठी,कृषीसहाय्यक यांच्या मार्फत पंचनामे पण झाले होते. परंतु त्या गोष्टीस सहा महिन्याचा कालावधी होऊन देखील शासनाच्या वतीने मदत मिळाली नाही. तरी शेतकऱ्यांना त्वरीत शासकीय मदत मिळावी अशी मागणी शेतकरी संघटनेमार्फत भडगाव तहसिलदारांना निवेदन देण्यात आले आहे. याबाबत भडगाव तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि ,
तालुक्यात २० ते २३ मार्च दरम्यान अवकाळी पाऊस व गारपीट झाली होती. त्यात हजारो हेक्टर वरील केळी,लिंबू फळ बागा, व रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावुन नेला होता .वरील नुकसानीचे पंचनामे होऊन सहा महिने उलटून गेले आहेत. अजूनही शासना मार्फत नुकसानग्रस्त शेतकर्यांना शासकीय आर्थिक मदत मिळाली नाही. तरी शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी. अशा प्रकारचे निवेदन शेतकरी संघटनेच्या वतीने निवाशी नायब तहसिलदार रमेश देवकर यांना देण्यात आले आहे . या प्रसंगी शेतकरी संघटनेचे भडगांव तालुका अध्यक्ष अखिलेश पाटील, जिल्हा अध्यक्ष संजय महाजन,संभाजी माळी,देविदास चित्ते,सरदारसिंग पाटील संजय पाटील आदी उपस्थित होते. फोटो — भडगाव नायब तहसिलदार रमेश देवकर यांना निवेदन देतांना अखीलेश पाटील, संभाजी माळी, संजय पाटील, देविदास चित्ते आदि.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!