गोंडगाव विदयालयात आदर्श शिक्षक एल एस पाटील यांचा सत्कार
भडगाव — तालुका प्रतिनिधी ( राजू दिक्षित )
रा. स. शि. प्र. मंडळ संचलीत गोंडगाव ता. भडगाव येथील माध्यमिक विदयालयाचे उपशिक्षक एल एस पाटील यांना भारतीय राष्टीृय युवा परीषद भडगाव मार्फत आयोजीत कार्यक्रमात आदर्श शिक्षक पुरस्काराने भडगाव येथे नुकतेच सन्मानीत करण्यात आले होते.
हा कार्यक्रम ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी भडगाव येथील आदर्श कन्या विदयालयात संपन्न झाला. एल एस पाटील यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल गोंडगाव माध्यमिक विदयालयात विदयालयाचे मुख्याध्यापक ओ पी जाधव यांचेसह शिक्षक, शिक्षकेत कर्मचार्यांनी पुष्पगुच्छ, टोपी, टाॅवेल, श्रीफळ देउन सत्कार केला. यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापक ओ पी जाधव, सी एस सोन्नीस, एस डी चौधरी, पी व्हि जाधव, एस वाय पाटील, एस आर पाटील, जी जे भोसले, बी डी बोरसे, बी आर साळुंखे, एस आर महाजन, बी एस वाडेकर, आर बी महाले, एस एस आमले, पी जे देशमुख, ए एम परदेशी, एस जी भोपे, एस एल मोरे, व्हि एम जाधव आदि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, गोंडगावचे सामाजीक कार्यकर्ते रविंद्र सुर्यवंशी जयश्रीराम आदि उपस्थित होते.
यावेळी सुञसंचलन बी आर साळुंखे यांनी केले. तर आभार व्हि एम जाधव यांनी मानले.
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण भडगाव तालुक्यातील बातमी 9730002081 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
राजू दिक्षित
भडगाव तालुका प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-9730002081