शासनदरबारी कीर्तनकारांची नावे समाविष्ट करा – वारकरी परिषदेचे निवेदन 

भडगाव – तालुका प्रतिनिधी -( राजू दिक्षित )

शासनदरबारी कीर्तनकारांची नावे समाविष्ट करून घ्यावीत यासाठी आज दि ३ रोजी दुपारी भडगाव तालुका वारकरी साहित्य परिषद च्या वतीने तहसीलदार मुकेश हिवाळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वारकरी साहित्य परिषदेचे तालुका अध्यक्ष हभप शाम महाराज शास्त्री , हभप  लक्ष्मण खैरणार सर, हभप निकम   बाबा शिरसाठ, हभप योगेश कांतीलाल शिंपी , हभप नाना खैरे 
उपस्थित होते . 

कीर्तनकार हे समाज कल्याण व जाती भेद दूर करून जनजागृतीे कार्य, धर्म शिक्षण , सद्भभावना, शांतता संदेश देतात, त्यांची अद्याप शासन दरबारी नोंद नाही .  कोरोना काळात त्यांनाहि सानुग्रह अनुदान मिळावे व आदी योजनांचा लाभ व्हावा म्हणून सर्व कीर्तनकार, वारकरी गायक टाळकरी, विणेकरी, सहकारी वारकऱ्यांची शासकीय यादीत नोंद व्हावी. या मागणीसाठी आज वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने निवेदन देण्यात आले . यावेळी अनेक वारकरी संप्रदायाचे नावे हि निवेदना सोबत शासनास नोंद राहावी म्हणून देण्यात आली .

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!