योजना पाटील आदर्श रणरागिणी पुरस्काराने सन्मानित

भडगाव प्रतिनिधी – ( राजू दिक्षीत )

मानव संरक्षण समिती नवी दिल्ली रजि.- भारत सरकार भडगांव तालुका महिला अध्यक्षा योजनाताई पाटील 25 वर्षांपासून समाजसेवेचे कार्य करीत आहेत. या प्रदीर्घ समाजसेवेच्या काळात ताईंनी अनेक पदे विभूषित केली आहेत.

सामाजिक, राजकीय, धार्मिक, क्रीडा, अंधश्रद्धा निर्मुलन आणि जनजागृती इत्यादी क्षेत्रात तसेच कोरोना पार्श्वभूमीवर ताईंनी प्रशंसनीय कामगिरी केली आहे. यशस्विनी अभियान प्रमुख, पोलिस महिला दक्षता समिती अध्यक्षा तसेच नगरसेविका म्हणून त्या काम करत असताना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे कार्य अविरत सुरू आहे.

शासनाच्या विविध योजना निराधार गरजूंना मिळवून देण्यासाठी ताई सतत प्रयत्नशील असतात. गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे, कष्टकरी महिला किंवा अशा अनेक उपेक्षितांना वेगवेगळ्या प्रकारची मदत करणे ताईंचे अशा विविध प्रकारचे समाज सेवेचे कार्य अविरत सुरू असताना योजनाताईंना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

नुकताच योजनाताईंना भारत सरकार संलग्न महाराष्ट्र शासन पुरस्कार सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर मार्फत महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श रणरागिणी या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याबद्दल ताईंचे हार्दिक हार्दिक मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीस लाख लाख शुभेच्छा…!!!

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण भडगाव तालुक्यातील बातमी 9730002081 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
राजू दिक्षित
भडगाव तालुका प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-9730002081

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!