आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा कधी सुटणार पाढा?-श्रीकांत मराठे यांचा आर्त सवाल

भडगाव प्रतिनिधी – ( राजू दिक्षित )

आमडदे-गेल्या दिड वर्षापासुन कोरोना आजाराशी दोन हात करत असतांना, आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी हे फ्रंट लाईन वर्कर म्हणुन, स्वतःच्या आणि परिवाराच्या जीवाची कशाचीही पर्वा न करता,निस्वार्थपणे जनतेला आरोग्य सेवा देत असतांना, त्या आरोग्य विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांना फक्त कोरोना योध्दे म्हणुन सर्वत्र सत्कार होत असतांना मात्र.. ह्या कोरोना योध्द्यांच्या समस्यांचा पाढा कधी सुटणार आहे का..? असा आर्त सवाल, महाराष्ट्र राज्य जि.प.बहुउद्देशीय आरोग्य सेवा कर्मचारी मध्यवर्ती संघटना जळगावचे जिल्हा सचिव श्रीकांत मराठे यांनी विचारला आहे.याबाबतीत अधिक माहिती देतांना मराठे यांनी सांगितले की, जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या समस्यांची यादी वाचायला खुप मोठी आहे.
त्यांत वेळेवर वेतन होत नाही.दोन ते तीन महिने उशिराने वेतन होते. दिवस-रात्र कार्य करुन आमचे हक्काचे,वेळेवर वेतन होत नाही, हे आमचे दुर्दैव आहे.सतत उशिराने होणाऱ्या वेतनामुळे घरभाडे,किराणा,दुध, लाईटबील,घराचे कर्जावरील हप्ते आणि हप्त्यावरील व्याज,ग.स. सोसायटीचे कर्ज हप्ते,आई-वडील व परिवारावर होणारा औषधोपचारावर खर्च, मुलाबाळांच्या शिक्षण,क्लासेसवर होणारा दरमहा खर्च इत्यादी सर्व बाबी ह्या वेतनावर विसंबुन असल्याने वारंवार वेतन उशिराने होत असल्यामुळे आम्हांला आत्ता उसनवारी पैसेही देखील कोणी द्यायला तयार होत नाहीत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेतनाविषयी विचारणा केली असता,ते अधिकारी टोलवाटोलवी करून,आम्हांला एकामागून-एक कामांचा भडीमार सुरूच ठेवतात.कार्यक्षेत्रात कामे करीत असताना आरोग्य कर्मचाऱ्यांची मानसिक,शारीरिक तसेच बौद्धिक क्षमता जर स्थिरावली नसेल तर…
कोणत्या मनस्थितीत आणि कोणत्या परिस्थितीत आम्हीं आरोग्य कर्मचाऱ्यांनी कार्यक्षेत्रात कामे करावीत ?तरी आमचे वेतन दरमहा 1 तारखेला व्हावे व बऱ्याच दिवसापासून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत,त्यांचेही त्वरित निर्णय निकाली काढावेत.अन्यथा आम्हीं सर्व आरोग्य कर्मचारी पेटून उठल्याशिवाय राहणार नाहीत.आणि शेवटी नाईलाजाने आम्हांला कामबंद आंदोलन,मोर्चे, उपोषण हेच शेवटचे शस्त्र उपसावे लागेल.अशी चेतावणी वजा इशारा मराठे व सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!