भडगाव येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेचा चौथा वर्धापन दिन सोहळा संपन्न कवी प्रा डॉ रमेश माने कवी नामदेव महाजन यांना कवी केशवसुत पुरस्कार देऊन केले सन्मानित
भडगाव प्रतिनिधी – ( राजू दिक्षीत-mob-97300 02081 )
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा भडगाव वर्धापन दिनानिमित्त कवी केशवसुत पुरस्कार वितरण सोहळा भडगाव येथे महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा भडगाव शाखेचा चौथा वर्धापन दिनाच्या निमित्ताने मान्यवर कवींना केशवसुत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. भडगाव येथील संस्कृती फाउंडेशन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र बाळद रोड शिव कॉलनी येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य श्री सुनील पाटील हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून समर्पण हॉस्पिटल भडगावचे संचालक डॉ. निलेश पाटील होते. मान्यवर पुरस्कारार्थी मध्ये प्राध्यापक डॉक्टर रमेश माने मराठी विभाग प्रमुख प्रताप कॉलेज अमळनेर यांना सन २०१९/२० साठीचा कवी केशवसुत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच सन २०२०/२१ साठी ग्रामीण साहित्यिक कवी वाडे तालुका भडगाव येथील अहिराणी कवी नामदेव महाजन यांना कवी केशवसुत पुरस्कार वितरण करून सन्मानित करण्यात आले. यावेळी प्राध्यापक डॉक्टर रमेश माने यांनी आपण सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलो परंतु शब्दांनी मला घडवलं आणि आज जो काही आहे तो फक्त आणि फक्त शब्दांच्या ताकदीमुळे आणि शब्द ज्ञानामुळे आहे असे म्हटले. घुसर्डी तालुका भडगाव सारख्या छोट्याशा गावातून एम ए, पी एच डी करणारा मी पहिलाच होतो. आणि सीनियर कॉलेजला एखाद्या नामांकित कॉलेजचा मराठी विभाग प्रमुख पदी विराजमान होणारा देखील मी पहिलाच आहे. भडगाव नगरीत कर्मभूमी असलेला कवीवर्य केशवसुत यांच्या नावाने मला पुरस्कार मिळाल्याने माझी जबाबदारी वाढलेली आहे असे देखील ते म्हणाले. वाडे तालुका भडगाव येथील कृषी पूत्र नामदेव महाजन यांनी देखील शेती मातीने मला घडवले आणि शेती मातीच्याच रूपात मी कविता शोधत राहिलो आणि त्यामुळे माझ्या कविता या सर्वसामान्यांच्या मनाला भिडल्या असाव्यात असे ते म्हणाले. तसेच यावेळी अमळनेर येथील कवी रमेश पवार यांनी आपली बाप ही कविता रसिक मान्यवरांसाठी सादर केले. प्रमुख उपस्थिती मध्ये भडगावचे तालुका प्रतिनिधी पत्रकार अशोक बापू परदेशी हे होते. वर्धापन दिन सोहळा यशस्वितेसाठी परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक सुरेश कोळी कवी वाल्मीक अहिरे कवी संजय सोनार नगरदेवळेकर डॉ. प्रमोद पाटील डॉ. बी एस भालेराव पत्रकार बी एन पाटील यांनी परिश्रम घेतले. वर्धापन दिनाच्या निमित्ताने कार्यकारी विश्वस्त कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रतापराव हरी पाटील व जिल्हा दूध संघाच्या संचालिका व किसान शिक्षण संस्थेच्या सचिव डॉक्टर पूनम ताई पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जवाहर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक कवी रमेश धनगर यांनी केले आभार प्राध्यापक सुरेश कोळी यांनी मानले.