भडगाव येथे एकलव्य संघटनेची जिल्हा बैठक संपन्न. विविध विषयांवर चर्चा. पदाधिकारी निवड.

भडगाव वार्ताहर- राजू दिक्षीत

येथे एकलव्य संघटनेची जिल्हा पदाधिकार्यांची म्हत्वपुर्ण बैठक संपन्न झाली . या बैठकीला जळगांव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व आदिवासी भिल्ल समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते .या बैठकीत उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते व आदिवासी भिल्ल समाज बांधव यांच्या सर्वांच्या उपस्थितीत जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील भिल्ल समाजाच्या हितासाठी एक ऐतेहासिक निर्णय घेण्यात आला. एकलव्य संघटना संस्थापक तथा प्रदेश अध्यक्ष पदी पवनराजे सोनवणे यांची निवड करण्यात आली. यावेळी एकलव्य संघटनेचे जळगांव जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ व उपस्थित सर्व तालुका कमिटी व जिल्हा कमिटीचे पदाधिकारी उपस्थितीत होते. यावेळी भिल्ल समाज बांधवांच्या हस्ते नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष पवनराजे सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीत पदाधिकार्यांची निवड करणे, नविन घरकुलांसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष रवि सोनवणे, अपंग सेलचे जिल्हाध्यक्ष ऋषी पवार, भडगाव तालुकाध्यक्ष संजय सोनवणे, टायगर फोर्सचे तालुकाध्यक्ष मुरलीधर मोरे, शहाराध्यक्ष दशरथ मोरे, तालुका सचीव सखाराम सोनवणे, यशवंतनगर शाखाध्यक्ष दिनकर सोनवणे, तालुका उपाध्यक्ष सुभाष मोरे, तालुका कार्याध्यक्ष दादाभाऊ बहिरम, चाळीसगाव तालुकाध्यक्ष नाना सोनवणे, चोपडा तालुकाध्यक्ष सुशिल सोनवणे, पारोळा तालुकाध्यक्ष गणेश भिल्ल, धरणगावचे तालुकाध्यक्ष संजय पवार यांचेसह इतर तालुक्यांचे अध्यक्ष, कार्यकर्ते हजर होते. यावेळी जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ यांनी प्रास्तविक केले. २० वर्षापासुन संघटना समाजाचे हितासाठी काम करीत आहे. यापुढेही संघटनेमार्फत जोमाने काम सुरु राहील असेही जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ यांनी मांडले. तसेच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पवनराजे सोनवणे यांनी मनोगतातुन सांगीतले कि, आपले संघटनेमार्फत चाळीसगावला २३ सप्टेंबरला पहीले भव्य अधिवेशन घेण्यात येईल. समाजबांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही समाजबांधवांना केले. आपली ताकद या अधिवेशनात दाखवुन देउ. समाजाच्या हितासाठी आपण यापुढेही अधिक जोमाने काम करु. असेही शेवटी प्रदेशाध्यक्ष पवनराजे सोनवणे यांनी सांगीतले. नंतर रवि सोनवणे, संजय सोनवणे यासह अनेकांनी आपले मनोगत मांडले. या बैठकीत समाजाच्या अडीअडचणी, समस्या याबाबत चर्चा करण्यात आली. नवीन घरकुल मंजुर करणे, ज्या लोकांना घरकुल मंजुर झालेले आहेत.परंतु त्या लोकांना नावे जागा नाही. ज्या लोकांना घरकुल मंजुर असुन जागाच नाही. प्रत्येक गावातील स्मशानभुमी नावे लावण्यात यावी. जातीचे दाखले काढुन देण्यात यावे. नवीन रेशनकार्ड, यावल कार्यालय अनुदानाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच यावेळी म्हत्वपुर्ण एक ठराव करण्यात आला. त्यात एकलव्य संघटनेचे पहिले अधिवेशन २३ सप्टेंबरमध्ये चाळीसगावं येथे तंट्यातात्या भिल्ल यांच्या जयंती निमित्त घेण्यात येणार आहे अशीही घोषणा करण्यात आली .तसेच एकलव्य संघटनेचे प्रदेश कमिटीचे सर्व पदे व सर्व जिल्ह्यातील प्रमुख पदांची येत्या पंधरा दिवसात निवड करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. यावेळी बैठकीला हजारोंच्या संख्येने आदिवासी भिल्ल समाज बांधव व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. फोटो — भडगाव येथे जिल्हा बैठकीत प्रदेशाध्यक्ष पदी पवनराजे यांचे निवडीवेळी रवि सोनवणे, संजय सोनवणे यांचेसह जिल्हयाचे पदाधिकारी.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!