गौरव कार्याचा सन्मान कर्तृत्वाचा विभागात वैशाली पाटील यांना कृषि विभागाचा कृषी संजीवनी मोहीम २०२१ उल्लेखनीय कामगिरी बद्दल गौरविण्यात आले.
भडगाव प्रतिनिधी -राजू दीक्षित
भडगाव तालुक्याच्या कृषी सहायक वैशाली पाटील यांनी तालुक्यात कृषी संजीवनी मोहीम २०२१ उल्लेखनीय कामगिरी बद्दल गौरविण्यात आले,कृषी विभागाच्या सर्व योजनाच्या माध्यमातुन केलेल्या कार्याची प्रशासनाने दखल घेत,भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनाचे अवचित्त साधून कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कृषी विभागाच्या वतीने कृषी संजीवनी मोहीम २०२१ चा गौरव सत्कार जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे पाणी पूरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले या प्रसगी जिल्हाधिकारी डॉ.श्री.अभिजित राऊत साहेब तसेंच जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जळगाव श्री.संभाजी ठाकूर साहेब व कृषि उपसंचालक जळगाव श्री अनिल भोकरे साहेब आत्माचे संजय पवार,तुषार देसाई,निलेश वानखेडे जिल्हा स्तरावरील सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
शेतकरी बांधवांना तालुका कृषि अधिकारी मा.गोर्डे साहेब यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली व शासनाची प्रत्येक योजना कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ शेतकरींच्या हितासाठी सदैव काम करत असतांना त्याची दखल अशा पुरस्काराच्या माध्यमातून घेतली जाते,तेंव्हा अधिक आनंद वाटतो.विशेषबाब म्हणजे वैशाली पाटील यांच्या सन्मानाचे स्वागत तालुक्यातील सर्व शेतकरी गट व शेतकरी बांधव आनंदाची लहर पसरली असून खऱ्या निष्ठेने काम करनाऱ्या कर्मचाऱ्याचा सन्मान झाल्याने भविष्यातही कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करेल असा विश्वास आहे.