करुणा शर्मा यांना अटक, धनंजय मुंडेंवर केला गंभीर आरोप
बीड,
राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या होमग-ाऊंडमध्ये अर्थात बीडमध्ये करुणा शर्मा यांनी एंट्री करून एकच धुरळा उडवून दिला. पण, त्यांच्या गाडीत पिस्तुल सापडल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांनी जबरदस्ती आणि बळाचा वापर करून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मला फसवायचा प्रयत्न करत आहेत. माझ्या गाडीत जबरदस्तीने रिव्हॉल्व्हर ठेवली, असा आरोप करुणा शर्मा यांनी केली. त्याना परळी पोलिसांनी अटक केली आहे.
परळी येथील वैजनाथ मंदिराच्या समोर दर्शनासाठी आल्यानंतर करुणा शर्मा यांची गाडी अडवून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला गेला होता. या नंतर खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलीस प्रशासनाने त्यांना शहर पोलीस ठाण्यात आणले. यावेळी त्यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये पिस्तुल आढळून आली, यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करून वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले.
परळी शहरात करुणा शर्मा च्या पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी मंदिराच्या समोर करुणा शर्मा यांना अडवले. यावेळी परळीतील महिला नेत्यांना जाब विचारला परिस्थिती तणाव निर्माण होता. हे लक्षात येताच पोलिसांनी त्यांना मंदिराच्यासमोर रोड बाहेर काढून दिले. पुन्हा मुंडे समर्थक आणि त्यांची गाडी आल्यानंतर पोलिसांनी त्यांना शहर पोलीस ठाण्यात घेऊन गेले होते.
धनंजय मुंडे यांनी जबरदस्ती आणि दबाव टाकून माझ्या गाडीत रिव्हाल्वर टाकली आणि माझ्या वरील खोटे गुन्हे दाखल केले आहे. धनंजय मुंडे यांनी जोर जबरदस्ती बळाचा वापर केला आहे, असा आरोप करून शर्मा यांनी केला आहे.
करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा हिने सर्वात अगोदर मुंबईतील ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. तसंच टिवट करत तक्रारीची कॉपीपोस्ट केली होती. यावेळी रेणू शर्मा यांनी गंभीर आरोप केले होते, यानंतर करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यामधील संबंध व प्रकरण समोर आले. याला धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करत पुष्टी दिली तसंच त्यांचे कधीपासून सहसंबंध आहेत. या संदर्भात देखील खुलासा केला. यात करुणा शर्मा यांच्यापासून धनंजय मुंडे यांना दोन आपत्य असल्याचे पहिल्यांदा धनंजय मुंडे यांनी फेसबुकवरून जाहीर केले होते.
काही दिवसानंतर रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतल्यावर हे प्रकरण तीन चार महिने शांत झाले. यावेळी धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्या सोबत घटस्फोट प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. कोर्टामध्ये केस सुरू असल्याचे फेसबुकवरील पोस्टमध्ये नमूद केले होते. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून करुणा शर्मा या संपत्ती पासून सामाजिक आणि राजकीय विषयावर ती कायम भाष्य करत होत्या. तसंच फेसबुक लाईव्ह करत होत्या. दोन दिवसांपूर्वी त्यांनी फेसबुक लाईव्ह करत मी परळीमध्ये येणार आहे तसंच पत्रकार परिषद घेऊन सर्व काही सांगणार आहे, असं सांगितल्यानंतर बीडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.