बीड : डॉक्टर असलेल्या भाजप नगराध्यक्षाचे गर्भवती महिलेशी ईल चाळे; गुन्हा दाखल

बीड,

गर्भवती महिलेची सोनोग-ाफी करायची असा बहाणा करून डॉक्टरने सोनोग-ाफी सेंटरमध्ये तिच्याशी ईल चाळे करत जातीवाचक बोलून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना धारूरमध्ये मंगळवारी दुपारी घडली. सदरील डॉक्टर भूलतज्ज्ञ असून, धारूरचा भाजपचा नगराध्यक्ष आहे. डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकाराने राजकीय व आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. डॉ. स्वरूपसिंह हजारी (वय अंदाजे 60) असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे.

धारूर येथील घटना –

डॉ. हजारी हा धारूर नगरपालिकेत सध्या नगराध्यक्ष पदावर आहे. तसेच स्त्रीरोगतज्ज्ञ असून, धारूरमध्येच तो खासगी दवाखाना चालवतो. मंगळवारी दुपारी एक गर्भवती तपासणीसाठी तेथे आली होती. तिला सोनोग-ाफी करायची असा बहाणा सांगत सोनोग-ाफी सेंटरमध्ये नेले. काही वेळातच डॉक्टरने तिच्याशी ईल चाळे करण्यास सुरुवात केली. तसेच जातीवाचक बोलला.

डॉक्टरवर गुन्हा दाखल –

हा प्रकार नातेवाईकांना सांगून गर्भवती थेट धारूर पोलीस ठाण्यात पोहचली. तक्रार दिल्यानंतर डॉ. हजारी विरोधात विनयभंग व अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे हे करीत आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!