आयकर विभागाची कारवाई राजकीय हेतूने असेल तर ही चुकीची बाब – आमदार रोहित पवार
बारामती (पुणे)
आयकर विभागाकडून गेल्या तीन दिवसांपासून अजित पवार यांचे नातलग आणि निकटवर्तीयांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी सुरू करण्यात आली. यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उगाचच राजकीय हेतूने त्रास देण्यासाठी अशी छापेमारी केली जात असेल तर ही चुकीची बाब आहे. आपल्या कुटुंबीयांना त्रास होत असेल तर ही गोष्ट कोणालाही आवडनार नाही. आयकर विभाग कोणाच्याही घरी छापेमारी करू शकते. मात्र यामध्ये राजकीय होतू नसावा, असे मत आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. बारामती येथे रविवारी (दि. 10) एका कार्यक्रमानंतर आमदार रोहित पवार माध्यमांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आयकर विभागाची छापेमारी कोणावरही होत असते, मात्र कुटुंबियांना त्रास दिला जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र ही छापेमारी उगीचच त्रास देण्याच्या हेतूने नसावी. सध्या राज्य आर्थिक संकटात आहे. केंद्राकडून अपेक्षीत निधी मिळत नसताना महाविकास आघाडी सरकार अतिवृष्टीच्या संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अद्याप त्या भागातील पंचनामे पूर्ण होत आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी कर्ज काढू पण शेतक-यांना मदत करू, असा शब्द दिला आहे. राज्यसरकारमधील जबाबदार व्यक्ती ज्यावेळी असा शब्द देते तेंव्हा कोणताही शेतकरी मदतीपासून वंचीत राहणार नाही, असा विश्वास मला वाटतो.
आर्यन खान ड्रग्स् प्रकरणावर भाष्य करताना आमदार रोहित पवार म्हणाले, ग-ामविकास मंत्री नवाब मलिक यांनी जो मुद्दा मांडला तो आधी समजून घेतला पाहिजे. ज्या बोटीवर शंभर दीडशे मुलेमुली होत्या, त्यातील ठराविक लोकांनाच का पकडले. इतरांना कशाच्या आधारावर सोडले. तसेच या प्रकरणी कारवाई करतान भाजपचे पदाधिकारी कसे काय उपस्थित होते, असे प्रश्न कोणाही सर्वसमान्य नागरिकाला पडणारे आहेत. ड्रग्स् घेणारा कोणीही असो कारवाई होत असेल तर सर्वांना समान न्याय द्यायला हवा. यातून नेमका काय संदेश देणार आहात, असा सवाल देखील रोहित पवार यांनी यावेळी केला. तसेच नितेश राणे यांना काय म्हणायचे आहे, तेच मला कळत नाही, असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.