कौतुकास्पद… लहानपणी विकायचा चहा-भजी, आता पोलिस करतील कडक सॅल्युट, बारामतीचा अल्ताफ झाला आयपीएस अधिकारी
बारामती,
तालुक्यातील काटेवाडी या ग-ामीण भागातील अल्ताफ शेख या तरुणाणे जिद्द व चिकाटीच्या जोरावर आयपीएस पदावर विराजमान होऊन ग-ामीण भागातील मुलांना प्रोत्साहन दिले आहे. शाळेत असताना भजी व चहा विक्रीचे काम करणार्या अल्ताफ शेख या तरूणाने आयपीएस अधिकारी होऊन बारामती तालुक्याची मान उंचावली आहे.
स्पर्धा परीक्षा करणार्या तरूणांना दिला सल्ला –
घरची परिस्थिती हालाखीची असतानाही अल्ताफ शेख यांनी परिस्थितीचे कारण पुढे न करता जिद्दीने अभ्यास करून हे पद मिळवले. दरम्यान त्यांनी असे सांगितले आहे की, ’ज्यावेळी एखादी गोष्ट आपल्या पोटावर येते त्यावेळी माणुस हा झटायला लागतो, त्यामुळे जे आपले धैर्य आहे ते आपल्या पोटावर आले पाहिजे, असा सल्ला त्यांनी स्पर्धा परीक्षा करणार्या तरूणांना दिला आहे.
अल्ताफ शेख यांची कहाणी तरुणांसाठी प्रेरणादायी –
बारामती तालुक्यातील ग-ामीण भागातील तरुणांना स्पर्धा परिक्षांना सामोरे जाण्यासाठी मदत व्हावी या उद्देशाने बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार व सुनेत्रा पवार यांच्या पुढाकारातून राष्ट्रवादी करिअर अकॅडमी सुरु करण्यात आली आहे. याच अकॅडमीतून शिक्षण घेतलेला अल्ताफ शेख आज आयपीएस अधिकारी बनला आहे. अल्ताफ शेख यांची कहाणी तरुणांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
सध्या इंटेलिजन्स ऑॅफिसर म्हणून उस्मानाबाद येथे कार्यरत –
केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देत असताना या अगोदर असिस्टंट कमांडट बनले होते. इस्लामपूर येथे नवोदय विद्यालयात शिक्षण घेतलेले अल्ताफ यांनी फूड टेक्नॉलॉजीतून बी.टेक.ची पदवी प्राप्त केली आहे. 2013 पासून ते बारामतीत वास्तव्यास आहेत. तर सध्या इंटेलिजन्स ऑॅफिसर म्हणून उस्मानाबाद येथे कार्यरत आहेत. राष्ट्रवादी करिअर अकॅडमीमधून आजपर्यंत 47 तरूण राजपत्रित अधिकारी बनले आहेत.
’माझ्या काकांनी कर्ज काढून शिक्षण करण्यासाठी मदत केली’
आयपीएस म्हणून निवड झाल्यावर अल्ताफ शेख म्हणाले की, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार यांनी पुण्यात मदत केली तर माझ्या काकांनी कर्ज काढून शिक्षण करण्यासाठी मदत केली. तर राष्ट्रवादी करियर अकॅडमी येथील समीर मुलाणी यांनी वेळोवेळी मदत व मार्गदर्शन केले असे त्यांनी सांगितले.