अंगणवाडी कर्मचा-यांचे कार्य म्हणजेच एक राष्ट्रसेवा आहे – दिपाली चौधरी झोपे

सही पोषण देश रोषन अंतर्गत पोषण माह चा दसनूर येथे समारोप

बलवाडी प्रतिनिधी:-(आशिष चौधरी)

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प रावेर १ अंतर्गत निंभोरा बीट मधील दसनूर अंगणवाडी येथे सही पोषण देश रोषन अभियानाचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी पोषण माह अंतर्गत १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर पर्यंत दसनूर अंगणवाडी येथे राबविण्यात आलेल्या विविध ८० उपक्रमांची माहिती देण्यात आली.तसेच कार्यक्रमात गरोदर मातांना बेबीकिट व कुपोषित बालकांना मान्यवरांच्या हस्ते पोषक आहार वाटप करण्यात आले.गावातील मुलींसाठी कडधान्याची रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात येऊन मान्यवरांच्या हस्ते तीन मुलींना उत्कृष्ट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अंगणवाडी कर्मचा-यांचे कार्य म्हणजेच एक राष्ट्रसेवा आहे असे प्रतिपादन याप्रसंगी खान्देश नारीशक्ती अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रावेर पंचायत समितीच्या मा.उपसभापती अनिता महेश चौधरी होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर फैजपूर येथील खान्देश नारीशक्ती अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे,प्रकल्प अधिकारी-२ श्रीमती जे के तायडे, पर्यवेक्षीका श्रीमती एस बी तडवी, श्रीमती एस डी चौधरी, श्रीमती एस डी दडमल, प्रकल्प २ च्या पर्यवेक्षीका श्रीमती सुरक्षा राजपूत, ग्रामपंचायत उपसरपंच कुंदन कोळी, सदस्य अशोक पाटील, मयूर महाजन, सदस्या सुवर्णा चौधरी, प्रिती चौधरी, ग्रामसेवक विजय पाटील, सोमेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक महाजन सर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दसनूर अंगणवाडी सेविका भारती भंगाळे, सविता चौधरी, पपिला पाटील, मदतनीस रजनी पाटील,अलका कोळी, सुरेखा चौधरी, ग्रामपंचायत क्लार्क अनिल कोळी, शिपाई महेंद्र तायडे, श्रीकांत महाजन यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भुमी लासुरे या ४ वर्षांच्या चिमुकलीने बापुजींवर आधारीत गीत सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.यावेळी तिने कडधान्याने सजवलेला ड्रेस परिधान केला होता.सोमेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थीनींनी सुंदर स्वागत गीत सादर करुन मान्यवरांचे स्वागत केले.डॉ.चंदलवार यांनी योग व निसर्गोपचाराचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंगणवाडी सेविका भारती भंगाळे यांनी, सुत्रसंचलन संदिप पाटील यांनी व आभारप्रदर्शन सुरक्षा राजपूत यांनी केले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!