बलवाडी येथे लसीकरण शांततेत पार

बलवाडी प्रतिनिधी:- ( आशिष चौधरी )

रावेर तालुक्यातील बलवाडी येथे निंभोरा प्राथमिक आरोग्य केंद्रअंतर्गत प्रा.आ.केंद्राचे डॉ चंदन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड 19 चे लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते.

सविस्तर वृत्त असे की निंभोरा प्राथमिक आरोग्य केन्द्र अन्तर्गत आज o९/o९/२०२१ रोजी कोविड १९ चे जवळजवळ १०००लसीचे डोस उपलब्ध झाले होते .गावकरयांच्या मदतीने तसेच बलवाडी चे सरपंच विनायक पाटील ग्रा. प सदस्य मुरलीधर पाटील गजानन चौधरी डॉ. महेंद्र अजलसोंडे, आरोग्य सेवक हिरालाल तायडे, आरोग्य सेविका खाचने सिस्टर, कम्प्युटर ऑपरेटर निलेश जैन, करुणा शिंपि अंगणवाडी सेविका,शारदा मोरे ,लता महाजन लीला बाई सुरवाडे.आशा वर्कर वंदना बोरनारे,विनोद धनगर,लता पाटील आशा वर्कर जयश्री महाजन,मदतनिस भारती तायडे यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!