पाण्याची तीव- अडचण असणार्‍या मराठवाड्यातील भागांना पाणी देण्यासाठी पर्याय शोधा – जलसंपदामंत्री जयंत पाटील

मुंबई प्रतिनिधी

20 जुलै

मराठवाड्यातील पाण्याची तीव- अडचण भासत असणार्‍या जिल्ह्यांचा, तालुक्यांचा व भागांचा अभ्यास करावा तसेच या भागांना पाणी देण्यासाठीचे पर्याय शोधावे, असे निर्देश राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज संबधित अधिकार्‍यांना दिले. सिल्लोड तालुक्यातील जलसंपदा विभागाच्या विविध प्रश्नांबाबत आज महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासमवेत मंत्रालय येथे बैठक झाली.

या बैठकीत भराडी बृहत लघु पाटबंधारेसंदर्भात सर्वेक्षण करण्याबाबत चर्चा झाली. त्याचे सर्वेक्षणाचे काम लवकर पूर्ण करावे, असे निर्देश श्री. पाटील यांनी दिले.

या भागातील अजिंठा, अंधारी मध्यम प्रकल्प, सोयगाव लघु प्रकल्पातील अतिरिक्त वाहून जाणारे पाणी, सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीबाबत, खेळणा मध्यम प्रकल्पाची उंची वाढविणे, व या तालुक्यातील नवीन सिंचन प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पाणी उपलब्धतेनुसार नवीन सिंचन प्रकल्पासाठी सर्वेक्षण करण्यात यावे. तसेच सिल्लोड विश्रामगृह, खेळणा विश्रामगृह व सिल्लोड कार्यालय दुरुस्ती करणेबाबत बैठकीत चर्चा झाली.

दरम्यान, सिल्लोड तालुक्यात पाण्याची मोठी टंचाई असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे या भागात पाणी पोहोचवण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील असे आश्वासन मंत्री जयंत पाटील यांनी दिले

या बैठकीला, जलसंपदा विभागाचे सचिव (लाक्षेवि) अजय कोहिरकर, विशेष कार्यधिकारी तथा माजी अप्पर मुख्य सचिव विजय कुमार गौतम, सचिव (प्रकल्प समन्वयक) टी.एन मुंडे, मुख्य अभियंता अतुल कपोले व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!