औरंगाबाद प्राणीसंग-हालय आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे; परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे पाठवावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

औरंगाबाद प्राणीसंग्रहालय आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे,अतिरिक्त निधीसाठी शासनाकडे  प्रस्ताव पाठवा, उद्धव ठाकरेंचे निर्देश | Aurangabad Zoo should be ...

मुंबई प्रतिनिधी

13 जुलै

औरंगाबाद महापालिकेतर्फे मिटमिटा येथे सुरू असलेल्या प्राणीसंग-हालयाचे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे त्यादृष्टीने लागणार्‍या अतिरिक्त जागेचा तसेच निधीचा परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी लवकरात लवकर पाठवावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.

वर्षा येथील समिती कक्षात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस आमदार संजय शिरसाट, प्रदीप जयस्वाल यांच्यासह महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, औरंगाबाद महापालिका आयुक्त आस्तीक पांडे यावेळी उपस्थित होते.

औरंगाबाद शहराला वैभवशाली असा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. हे शहर जागतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसीत करताना वेरूळ, अजिंठा लेण्यांप्रमाणे शहरांतर्गत पर्यटनस्थळं ही पर्यटकांच्या आकर्षणाची केंद्र झाली पाहिजेत हे विचारात घेऊन प्राणीसंग-हालयाचे काम झाले पाहिजे. औरंगाबादमध्ये आलेल्या पर्यटकांनी आवर्जून त्याला भेट दिली पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महापालिकेमार्फत सिद्धार्थ उद्यानात 14 एकर जागेवर प्राणीसंग-हालय कार्यरत असून ते मराठवाड्यातील एकमेव प्राणीसंग-हालय आहे. येथे ससे, नीलगाय, हरिण, मोर, कोल्हे, लांडगे, तरस, सिंह, अस्वल, वाघ, हत्ती आदी वन्यजीव आहेत. या प्राणीसंग-हालयाला जागा कमी पडत असल्याने केंद्रीय प्राणीसंग-हालय प्राधिकरणाने दाखविलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी व मानकांनुसार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मिटमिटा येथे 40 हेक्टरवर प्राणीसंग-हालयाचे काम सुरू आहे. या प्राणीसंग-हालयास तसेच सफारी पार्कसाठी अतिरिक्त जागा लागणार असल्याने त्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!