औरंगाबाद : वैजापूर तालुक्यात भीषण अपघात; बसच्या धडकेत तिघांचा मृत्यू

वैजापुर (औरंगाबाद),

येथील औरंगाबाद-वैजापुर महामार्गावरील खंडाळा येथील पालेजा पेट्रोल पंपाजवळ एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर बस रस्त्याच्याखाली नाल्यात जाऊन फसली सुदैवाने बस मधील प्रवाशांना किरकोळ मार लागला. हा अपघात मंगळवारी (ता.5) सायंकाळी 5 वाजता झाला. अमोल भाऊसाहेब ठुबे (वय 23) रा.पोखरी, सोमनाथ साहेबराव निकम (वय 25 ) रा. शिऊर व कडूबा ज्ञानेश्वर ठुबे ( वय 22 ) रा.पोखरी तालुका वैजापुर अशी मृतांची नावे आहेत.

या घटनेत एसटी बसमधील काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहे. हे तिघे दुचाकीवरपोखरीच्या दिशेने जात असतांना लासलगाव आगाराच्या बसने जोराची धडक दिल्याने तिघे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वैजापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक रज्जाक शेख, संतोष सोनवणे, योगेश वाघमोडे यांनी घटनास्थळी भेट दिली.

या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय घाडगे, संदिप चव्हाण हे करीत आहेत. बसचालक विकास सुर्यवंशी याच्यावर वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!