महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोग महाराष्ट्र सोबत हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन ची बैठक संपन्न! अल्पसंख्यांक योजना अल्पसंख्यांक समाजाच्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचवा- ज.मो. अभ्यंकर

मुंबई/ औरंगाबाद-

हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सरांनी महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्याक शिष्यवृत्ती बाबत जाचक अटी रद्द करणे बाबत महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक आयोग महाराष्ट्र यांच्याकडे धाव घेतली होती. निवेदनाद्वारे मांगणी केली होती की अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती बाबत जे जाचक अटी म्हणजे पालकाचा उत्पन्नाचा दाखला सक्षम अधिकारी म्हणजे तहसीलदार/ जिल्हाधिकारी चा असावा हे जाचक अट रद्द करण्यात यावी तसेच सरसकट 100% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी यासाठी पाठपुरावा केला होता व महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाने पत्र देऊन आज दिनांक 21 सप्टेंबर2021 रोजी महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष(मंत्री दर्जा) सोबत बैठक (सुनावणी) बोलावली होती…
या बैठकीस (सुनावणीस) स्वतः महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष (मंत्री दर्जा)
मा.ना.ज.मो. अभ्यंकर साहेब अध्यक्ष (मंत्री दर्जा) महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोग्य व अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण संचनालय चे सांचालक मा.सुपे साहेबांची ही उपस्थित होती. या सुनावणीत (बैठकीत) हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सरांनी एकच मुद्दा लावून धरले की उत्पन्नाचा दाखले ची अट रद्द करण्यात यावी ब अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे 100% टक्के मिळावी.

मा.ना.ज.मो. अभ्यंकर साहेब अध्यक्ष (मंत्री दर्जा) महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोग यांनी सविस्तर चर्चा केली व अल्पसंख्यांक संचालक मा. सुपे साहेब यांना काही आदेश व सूचना केल्या…

१) अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती च्या जाचक अटी हटविण्यासाठी आपल्या स्तरावर योग्य ती कार्यवाही व्हावी.
व लवकरात लवकर या जाचक अटी हटवण्यात याव्या.
२) अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती 1 हजाराहून कमीत कमी 5 हजार पर्यंत करण्यात यावी या साठी आपल्या कार्यालयातुन पाठपुरावा व्हावं…
३) 1 हजारासाठी इतक्या जाचक अटी का? या बाबत खुलासा करावा.
४) जे विद्यार्थी फॉर्म भरतील या सर्व विद्यार्थ्यांना म्हणजेच 100 टक्के विद्यार्थ्यांना सरसकट शिष्यवृत्ती मंजूर करण्यात यावी.
५) अल्पसंख्यांक शाळांचे अर्थसहाय्य अनुदान लवकरात लवकर देण्यात यावे.
६) अल्पसंख्यांक लोकांसाठी ज्या ज्या योजना आहे ते सर्व सामान्य लोकापर्यंत पोहचिवण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी व ती प्रभावी पणे राबविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मार्गदर्शन केंद उभारण्यात यावे किंवा अधिकारी नेमण्यात यावे.

यावेळी दालनात हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर, राज्य उपाध्यक्ष शफीक पठाण सर, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सय्यद ताजीमोद्दीन सर, तसेच अल्पसंख्यांक व प्रौढ संचनालाय पुणे चे संचालक मा.सुपे साहेब व त्यांचे कार्यातील अधिकारी पाटील सर आदींची उपस्थिती होती. शेवटी शेख अब्दुल रहीम सरांनी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष(राज्यमंत्री दर्जा) मा.ना.ज.मो. अभ्यंकर साहेब यांचे आभार मानले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!