अणखी एक यश हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन च्या पदरात!

औरंगाबाद प्रतिनिधी

हजारो डी. एड आणि बी.एड लास्ट इयर च्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा.

योग्य पाठपुरावा हीच हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन ची ओळख असल्याने पुन्हा एकदा सिद्ध झाले आणि हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन ने केलेल्या सतत पाठपुरावा (शालेय शिक्षणमंत्री ते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे व शिक्षण उपसंचालक कार्यालय औरंगाबाद) ला आज अखेर यश मिळाले. महाराष्ट्र राज्यातील लास्ट इयर च्या सर्व डी. एड आणि बी. एड च्या लास्ट इयर च्या (Appear) विद्यार्थ्यांना TET परीक्षेत बसण्याची मुभा देण्यात आली आहे. काल रात्री असे आदेश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे चे आयुक्त यांना शालेय शिक्षण विभागाचे सह-सचिव इम्तियाज काजी यांनी पत्र देऊन कळविले. हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सरांना अनेक डी. एड आणि बी.एड विद्यार्थ्यांचे मेसेज व फोन द्वारे विनंती करण्यात आले होते की याबाबत काही करा की नेहमी TET परीक्षेत डी. एड आणि बी.एड लास्ट इयर च्या विद्यार्थ्यांना संधी देण्यात येत होती या वर्षी डावलण्याचे प्रयत्न झाले आहे या बाबत काही तरी करावे व विद्यार्थ्यांच्या विनंती नुसार 11 ऑगस्ट ला हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन तर्फे शिक्षण उपसंचालक अनिल साबळे साहेबांना भेटून ह्याबाबत निवेदन देण्यात आले तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे आयुक्त मा. सुपेकर साहेबांना ही मेल आणि व्हाट्सप वर याबाबत पाठपुरावा करण्यात आले होते व सतत पाठपुरावा सुरू होता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे चे व उपसंचालक कार्यालय औरंगाबाद येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नेहमी संपर्कात होतो आणि काल रात्री हा आदेश प्राप्त झाले व त्याची कॉपी मला व्हाट्सप वर स्वतः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे चे अधिकारी मा. चिमने सरांनी पाठविले. हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन च्या वतीने शालेय शिक्षण मंत्री ना.वर्षाताई गायकवाड, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे चे आयुक्त मा. सुपेकर साहेब, तसेच त्यांचे PA मा.शेटे मॅम, आणि कार्यालयीन अधीक्षक मा. चिमणे सर आणि औरंगाबाद उपसंचालक मा. अनिल साबळे साहेब तसेच त्यांचे PA मा. गतखणे साहेब यांचे सहकार्य आणि योग्य पाठपुरावा मिळाल्याने त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले. या सर्व घडामोडीत हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष सय्यद ताजीमोद्दीन सर माझ्यासोबत खंबीरपणे उभे होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!