ओ.बी.सींचे राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी संघर्ष करा-बाळासाहेब कर्डक.

दैनिक महाराष्ट्र सारथी अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर समता परीषदेतर्फे ओ.बी.सी आरक्षण पे चर्चा कार्यक्रम संपन्न.

अमळनेर-भारताला स्वातंत्र्य होऊन अनेक वर्ष उलटून गेलीत परंतु ह्या देशामधे सर्वाधिक प्रमाणात असणार्या ओ बी सी समाजाची गणना झाली नाही यामुळे ओ बी सी समाजाच्या विकासाला खिळ बसली असुन.आता तर ओ.बी.सीं चे राजकीय आरक्षण सुद्धा रद्द करण्यात आले आहे.यामुळे ओ बी सी समाजाला प्रवाहातून बाजुला करण्याचे काम सुरु आहे त्यासाठी ओ बी सी समाजाच्या राजकीय आरक्षण वाचविण्यासाठी अ.भा महात्मा फुले समता परीषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगनरावजी भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ज्ञायालयीन लढाई व ओ बी सी समाजात जनजागृती सुरु आहे.ह्या लढाईत आपण जास्तीत जास्त संख्येने सामील व्हा अन्यथा भविष्यात राहिलेले आरक्षण देखील शिल्लक राहणार नाही यासाठी संघर्ष करा असे आवाहन समता परीषदेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी व्यक्त केले.
अ.भा महात्मा फुले समता परीषदेच्या वतीने माळी समाज मंगल कार्यालय माळी वाडा येथे ओ बी सी आरक्षण पे चर्चा ह्या आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते.व्यासपीठावर विभागीय संघटक अनिल नळे,आरक्षण अभ्यासक ॲड प्रतिक कर्डक,विभागीय निरीक्षक नितीन शेलार,जिल्हाध्यक्ष सतीश महाजन,जिल्हा सरचिटणीस भगवान महाजन,राजेंद्र महाजन उपस्थित होते.यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश महाजन यांनी प्रास्ताविक केले व मागास कृती समितीचे कार्याध्यक्ष रणजित शिंदे,माळी समाज सुधारणा मंडळाचे सचिव मनोहर महाजन,किशोर महाजन आदि मान्यवरांनी आरक्षणाबाबत आपले विचार मांडले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रा भिमराव महाजन,तालुकाध्यक्ष अमोल माळी,शहराध्यक्ष प्रताप पाटील,ता.उपाध्यक्ष शिवाजी महाजन,समाज अध्यक्ष गंगाराम महाजन,दिलीप पाटील,नगरसेवक धनंजय महाजन,साखरलाल महाजन,पंकज चौधरी,बाळासाहेब संदानशिव,भाऊसाहेब महाजन,पांडुरंग महाजन,ॲड.सुदाम महाजन,डाॅ उदय खैरनार,प्रा प्रकाश महाजन,गोकुळ बागुल,पराग चौधरी,जाकीर पठाण,दिपक चौधरी,महेंद्र महाजन,विजय माळी,भुषण महाजन,योगेश महाजन,मुरलीधर चौधरी,बाबुलाल पाटील,दिनेश माळी,विठोबा महाजन,प्रविण महाजन,बापुराव महाजन,जयेश महाजन,प्रशांत महाजन,विश्र्वास पाटील यांच्यासह ओ बी सी बांधव व समता सैनिक उपस्थित होते.सुत्रसंचालन अमोल माळी यांनी केले तर आभार प्रा भिमराव महाजन यांनी मानले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!