कापूस पिकविमा मंजूरीत पिक कापणी कालावधीचा अडसर

पातोंडा ता.अमळनेर – ( प्रा भुषण बिरारी )

पातोंडा व अंमळगाव मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने विमा कंपनीने तात्काळ 25 टक्के विमा मंजूर करा अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे. परंतू शासनाच्या धोरणानुसार खरीपातील पिकांकरीता कृषी मंडळात रोटेशन पध्दतीने दरवर्षी कृषी सहाय्यक, मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक यांचेकडे पिक कापणी तक्ते दिले जातात. साधारण जुन महिन्याचा दुसरा आठवडा ते जुलै चा पहिला आठवडा हा पेरणी (लागवड) कालावधी असतो. तसेच खरीपातील मूग, उडीद व सोयाबीन या पिकांचा कापणी कालावधी हा 25 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान असतो तर कापूस पिकाचा कापली कालावधी 10 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर हा असतो. कृषी विभागाचा कापणी प्रयोग तक्ता पुर्ण झाल्याशिवाय कोणत्या पिकांचे किती नुकसान झाले हे समजत नाही. या वर्षी पातोंडा मंडळातील कृषीचे पिक तक्ते मठगव्हाण, मुंगसे , नांद्रि , धुरखेडा, धावडे व कामतवाडी या गावात आहेत तर अंमळगाव मंडळातील पिक तक्ते जळोद , पिंपळी, सात्री व पिंगळवाडे येथे असल्याची माहिती कृषी सहाय्यक ए जे सुर्यवंशी व खैरनार यांनी दिली. खरीपातील मूग, उडीद या पिकांचा कापणी कालावधी 25 ते 30 ऑगस्ट दरम्यान असल्याने या पिकांचा पिकविमा लवकर मंजूर होण्याची शक्यता असेल तर कापूस पिकाचा विमा मंजूर होण्यासाठी पिक कापणी कालावधी अडसर ठरण्याची होण्याची शक्यता दिसून येत आहे. मुग , उडीद व कापूस या सह सर्वच पिकांना तात्काळ 25 टक्के विमा मंजूर करावा व दुसरा टप्पा पिक कापणी कालावधी नंतर होणा-या पिकांच्या नुकसानावर आधारीत उर्वरीत विमा रक्कम मंजूर करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे

.

( बाईटस् – )

" आम्ही नुकताच जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी यांचे सोबत अमळनेर तालुक्यात नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली असून, म. जिल्हाधिकारी यांचे नियंत्रणाखाली असलेल्या समितीची बैठक होऊन लवकरच शासनास अहवाल पाठवला जाईल. शासनाकडून ज्या पिकांच्या विमा मंजूरी येईल त्यांचा विमा तिस दिवसाच्या आत शेतक-यांना 25 टक्के मंजूर विमा रक्कम अदा केली जाईल. परंतू कापुस पिका बाबत पिक कापणी कालावधीच्या 10 दिवस आधी पाहणी करून निर्णय घेण्यात येईल. नुकसान ग्रस्त पिक विमाधारक शेतक-यांनी झालेल्या नुकसानीची माहिती भारती अॅक्सा विमा कंपनीच्या 1800-103-7712 या टोल फ्री नंबरवर अथवा भारती अॅक्सा कंपनीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर रामोशी , तालूका कृषी कार्यालय अमळनेर येथे प्रत्यक्ष लेखी स्वरुपात देऊ शकतात. त्यामुळे विमा कंपनी कर्मचारी आपल्या पिक नुकसानीची पाहणी करून आपणास न्याय देण्याचा प्रयत्न करतील." - प्रभासचंद्र, जळगाव जिल्हा व्यवस्थापक, भारती अॅक्सा

" मंडळ निहाय नुकसान सरासरी ठरवणे ही शासनाची अट चुकीची असून त्यामुळे ठराविक शिवारातील पिकांचे नुकसान होत असल्यास शेतकरी विमा लाभापासून वंचित राहतो म्हणून पिकविमा संरक्षण हे गावनिहाय नुकसानावर ठरवावे अशी चर्चा होतांना दिसून येत आहे." - दिलीप बोरसे , युवा शेतकरी तथा ग्रा पं सदस्य पातोंडा

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!